---Advertisement---

कर्णधार म्हणून मैदानात उतरताच संजू सॅमसनचा मोठा पराक्रम, खास क्लबमध्ये झाला सामील

On: सोमवार, एप्रिल 12, 2021 9:14 PM
Sanju-Samson
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा चौथा सामना सोमवारी (१२ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय राजस्थानने घेतला. राजस्थानचा नवनियुक्त कर्णधार संजू सॅमसनचा हा १०८ वा आयपीएल सामना आहे. या सामन्यात कर्णधार म्हणून उतरताच संजू एका खास क्लबमध्ये सामील झाला

कर्णधारांच्या या क्लबमध्ये झाला सामील
राजस्थान रॉयल्सने या हंगामाच्या सुरुवातीआधीच यष्टीरक्षक संजू सॅमसनला आपला कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. आज पंजाब विरुद्ध त्याने कर्णधार म्हणून पहिला सामना खेळला. याबरोबरच सर्वाधिक आयपीएल सामना खेळल्यानंतर कर्णधारपद भूषवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संजूचा समावेश झाला. या यादीत तो तिसऱ्या स्थानी आला आहे. संजूने १०७ सामने खेळल्यानंतर १०८ व्या सामन्यात संघाचे नेतृत्व केले.

या यादीमध्ये पहिल्या स्थानी मुंबई इंडियन्सचा उपकर्णधार कायरन पोलार्ड आहे. पोलार्डने तब्बल १३७ आयपीएल सामने खेळल्यानंतर २०१९ मध्ये पहिल्यांदा मुंबईचे नेतृत्व केले होते. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी रविचंद्रन आश्विन असून त्याने १११ सामन्यांनंतर कर्णधारपद भूषविलेले. भुवनेश्वर कुमारने १०३ आयपीएल सामने खेळून पहिल्यांदा सनरायझर्स हैदराबादसाठी कर्णधार म्हणून मैदानात पाऊल ठेवलेले. पाचव्या क्रमांकावर असलेला अजिंक्य रहाणे ९७ सामन्यांनंतर कर्णधार बनलेला.

विजयासाठी आतुर दोन्ही संघ
मागील हंगामात पंजाबचा संघ सहाव्या स्थानावर राहिला होता. गतहंगामात अखेरच्या स्थानी राहिलेल्या राजस्थान रॉयल्सलाही यावेळी विजेतेपद मिळवायचे आहे. या संघाने २००८ मध्ये पहिले जेतेपद जिंकले होते. परंतु, त्यानंतर संघाला कधीही विजेतेपद जिंकता आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

“तीन वर्ष वाट पाहावी लागली, अखेर स्वप्न पूर्ण झालं,” धोनीला पहिल्याच चेंडूवर बोल्ड करणाऱ्या आवेश खानची प्रतिक्रिया

केकेआरच्या फलंदाजांची वाढली धडधड, हार्दिक पंड्या येत्या सामन्यात गोलंदाजीस सज्ज?

बॉलिवूडचा ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणाऱ्या शाहरुखचे झाले आयपीएल पदार्पण, वाचा त्याची रोमांचक कहाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---