भारताचा स्टार यष्टीरक्षक आणि फलंदाज संजू सॅमसन आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. 26 वर्षीय विस्फोटक फलंदाज संजू सॅमसनने 2018 मध्ये आपली कॉलेजची मैत्रीण असलेली चारूलता सोबत विवाह केला होता. या लग्नाच्या दुसर्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजूने आपल्या पत्नीला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या. संजू सॅमसनने लग्नाच्या निर्णयाला आतापर्यंतचा सर्वात चांगला निर्णय असल्याचे म्हंटले आहे.
केरळच्या या स्टार फलंदाजाने वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी आपली कॉलेजची मैत्रीण चारूलता सोबत 22 डिसेंबर 2018 मध्ये लग्न केले होते. ते दोघे एकमेकांना इवानिओस कॉलेजमध्ये शिकत असताना पासून ओळखत होते. त्याच्या पत्नी चारूलताने बीएससी डिग्रीनंतर ह्युमन रिसोर्से मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. संजू आणि त्याची पत्नी चारूलता सामान्यपणे जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात.
साध्या पद्धतीने केला होता विवाह
या दोघांनी तिरुअंतपूरम येते एका साध्या कार्यक्रमात विवाह बंधनात अडकले होते. या विवाह सोहळ्यात 30 लोक सहभागी झाले होते. लग्नाच्या दुसर्या वाढदिवशी संजू सॅमसनने आपल्या पत्नी सोबतचा एक फोटो ट्विट करताना लिहले, “आज आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात योग्य निर्णय साजरा करत आहोत. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या हृदया.”
Today we celebrate the best decision WE ever made !!!
Happy Anniversary My ❤️ pic.twitter.com/QyE3fXrc5C— Sanju Samson (@IamSanjuSamson) December 22, 2020
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संजू सॅमसनची कामगिरी राहिली सुमार
आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून धमाकेदार कामगिरी केल्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार्या वनडे आणि टी-20 भारतीय संघात त्याची निवड झाली होती. कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर विश्वास दर्शवत त्याला तीन टी-20 सामन्यात खेळण्याची संधी दिली होती. मात्र त्याने या तीन सामन्यात 23, 15 आणि 10 धावाच केल्या.
संजू सॅमसनची कारकीर्द
संजू सॅमसनने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत 107 सामने खेळले आहेत, त्यापैकी 103 डावात खेळताना त्याने 2584 धावा केल्या आहेत. आयपीएल मधील त्याची सर्वाधिक धावसंख्या 102 आहे. त्याने आतापर्यंत 191 चौकार आणि 115 षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर त्याने 2 शतके आणि 13 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धा खेळताना राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स (दिल्ली डेअरडेव्हिल्स) अणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.