आयपीएल 2024 सुरु होण्यापूर्वी राजस्थान राॅयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं आपला मोबाईल नंबर बदलला होता. हा खुलासा संजूचे लहानपणीचे कोच बीजु जॉर्ज यांनी केला आहे. खेळावर लक्ष्य केंद्रित ठेवण्यासाठी संजूनं मोबाईल नंबर बदलला आहे. त्यामुळे तो जास्त लोकांच्या संपर्कात नसतो, असं कोच जॉर्ज यांनी स्पष्ट केलं आहे.
संजू सॅमसन यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त फाॅर्ममध्ये आहे. त्यानं या मोसमात 14 सामन्यांत 504 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. संजूच्या नेतृत्वात राजस्थाननं प्लेऑफ मध्ये स्थान मिळवलं आहे. आता एलिमिनेटरमध्ये राजस्थानचा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होतो आहे. या सामन्यापूर्वी संजूचा हा किस्सा समोर आला. आयपीएल सुरु होण्यापूर्वी त्यानं आपला मोबाईल नंबर बदलला होता. त्याचा नवा नंबर फक्त काही लोकांकडेच आहे.
संजूचे लहानपणीचे कोच बीजु जॉर्ज यांनी खुलासा केला की, “आयपीएल 2024 सुरु होण्यापूर्वी संजूनं आपला मोबाईल नंबर बदलला आहे. त्याचा नवीन नंबर फक्त काही जवळच्या लोकांकडेच आहे. त्याला त्याचं लक्ष विचलित होऊ द्यायचं नव्हतं. त्याचं संपूर्ण लक्ष खेळावर आहे. आजकाल तो त्याच्या जवळच्या लोकांशिवाय इतर कोणाशीही बोलत नाही.”
सॅमसननं खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःला सर्वांपासून दूर केलं आहे. तो पूर्णपणे त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करतोय. जर आपण आयपीएल 2024 मधील सॅमसनची कामगिरी पाहिली तर ती उत्कृष्ट आहे. त्याच्यासोबत राजस्थान संघानं देखील अप्रतिम खेळ दाखवलाय. आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर राहिला. संघानं 14 सामन्यांपैकी 8 सामने जिंकले.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीची प्ले-ऑफमधील आकडेवारी धक्कादायक! आरसीबीच्या चाहत्यांचा विश्वासच बसणार नाही
रेप केसमुळे अमेरिकेनं व्हिजा नाकारला, ‘या’ स्टार क्रिकेटपटूची वर्ल्डकपवारी हुकली