राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवार रोजी (२५ सप्टेंबर) अबु धाबी येथे आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील ३६ वा सामना झाला. या चुरशीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने निर्धारित २० षटकात ६ गडी गमावत १५४ केल्या. यात धाकड फलंदाज श्रेयस अय्यर याच्या महत्त्वपूर्ण खेळीचा मोठा वाटा राहिला. मात्र त्याच्या नेत्रदिपक खेळीवर अतिशय दुर्देवीरित्या पूर्णविराम लागला.
त्याचे झाले असे की, डावातील १४ वे षटका टाकण्यासाठी राजस्थानचा राहुल तेवतिया आला होता. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अय्यरने मोठा शॉट मारत ४ किंवा ६ धावा खात्यात जमवण्याचा विचार केला. मात्र तेवतियाच्या ऑफ साईडच्या दिशेने जात असलेल्या चेंडूवर अय्यरला व्यवस्थित शॉट मारला आला नाही आणि चेंडू सरळ यष्टीमागे उभा असलेल्या संजूच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला.
या सुवर्णसंधीला संजूने हातून जाऊ दिले नाही. त्याने तडखाफडखी हात चालवत वेगाने चेंडू यष्टीला मारला आणि विकेटचा जल्लोष साजरा करू लागला. या अवघड अशा विकेटचा निर्णय मैदानी पंचांनी न लावता तिसऱ्या पंचांनी लावला. यावेळी मोठ्या स्क्रिनवर स्पष्ट दिसत होते की, अय्यरचा पाय क्रिजवरील सीमारेषेच्या अगदी जवळ असताना संजूने त्याला यष्टीचीत केले होते.
https://twitter.com/PrithviMatka/status/1441723257267257347?s=20
त्याच्या या अतिशय अचूक आणि जलद यष्टीरक्षण कामगिरीने सर्वांना नक्कीच एमएस धोनीची आठवण करुन दिली असावी. श्रेयसच्या या विकेटची सोशल मीडियावर भरपूर चर्चा रंगली आहे. अनेकांनी संजूला त्याच्या कामगिरीसाठी शाबासकी दिली आहे.
Excellent work done by Sanju Samson.#DCvRR pic.twitter.com/Kt1sLonwP7
— عقیل احمد (@aqqu___) September 25, 2021
दुसरीकडे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला अय्यर ३२ चेंडूंमध्ये २ षटकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा करत बाद झाला. यामुळे केवळ ७ धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. मात्र त्याच्या या उपयुक्त आणि मोठ्या खेळीमुळे दिल्लीचा संघ १५४ धावांपर्यंत मजल मारू शकला. तो या सामन्यात दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याच्याव्यतिरिक्त शिमरॉन हेयमारयने काही आकर्षक षटके मारत २८ धावांचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभने भारतीय खेळाडूवर दाखवला विश्वास, १२१ षटकार ठोकणाऱ्या परदेशी फलंदाजाला राजस्थानविरुद्ध नारळ
DCvsRR, Live: पावरप्लेमध्ये राजस्थानची उडाली दाणादाण, ५ षटकात ३ विकेट्स गमावत अवघ्या १९ धावा फलकावर
टी२०त १८७ विकेट्स घेणाऱ्या राजस्थानच्या ‘या’ डावखुऱ्या गोलंदाजाचे ५ वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन