---Advertisement---

आधी किलर स्माईल अन् नंतर गगनचुंबी सिक्सर! संजू सॅमसनचा ‘हा’ व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

On: शनिवार, जुलै 24, 2021 9:56 AM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका संघात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.श्रीलंकाने ३ गडी राखत सामना खिशात घातला. या सामन्यात ५ भारतीय खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. अशातच आपला पहिलाच वनडे सामना खेळत असलेल्या युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचेच मन जिंकले आहे.

या सामन्यात तो ४६ चेंडूत ४६ धावा करत माघारी परतला. परंतु त्याने आपल्या एका शॉटने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. या खेळी दरम्यान अकिला धनंजयच्या चेंडूवर त्याने तुफानी षटकार लगावला. परंतु हा षटकार मारण्यापूर्वी, संजू सॅमसनने एक चेंडू मुद्दाम निर्धाव खेळला होता.

झाले असे की, १० व्या षटकातील दुसरा चेंडू, संजू सॅमसन खेळू शकला असता, परंतु त्याने तो सोडण्याचा निर्णय घेतला होता. चेंडू सोडल्यानंतर संजू सॅमसनच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. त्यानंतर पुढील चेंडूवर संजू सॅमसनने पुढे येऊन गोलंदाजाच्या वरून षटकार लगावला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Sanju Samson first six in odi ,watch video)

भारतीय संघाने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली होती. त्यामुळे अंतिम वनडे सामन्यात त्यांनी युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली होती. यामध्ये संजू सॅमसन, नीतीश राणा,चेतन सकारिया, के गौतम आणि राहुल चाहर यांचा समावेश होता.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून पृथ्वी शॉने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली तसेच पदार्पण करत असलेल्या संजू सॅमसनने ४६ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाचा डाव ४७ षटकात २२५ धावांवर संपुष्टात आला होता.

पावसामुळे हा सामना काही वेळ थांबवण्यात आला होता. त्यानंतर हा सामना ४७ षटक खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. श्रीलंका संघाला विजयासाठी ४७ षटकात २२७ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना, श्रीलंका संघाकडून अविष्का फर्नांडोने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली, तर भानुका राजपक्षणाने बहुमूल्य ६५ धावांचे योगदान दिले. याच खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाला ३ गडी राखून विजय मिळवण्यात यश आले.

महत्त्वाच्या बातम्या-

-प्रशिक्षक द्रविडच्या ‘या’ निर्णयामुळे श्रीलंकेचा क्लिन स्वीप हुकला, तिसऱ्या वनडेत भारताचा ३ विकेट्सने पराभव

-विराटसेनेला दुखापतींनी घेरले; भारतीय दिग्गज म्हणाले, भुवीसह ‘या’ ३ खेळाडूंना इंग्लंडला पाठवा

-“आधी बाबर आजमला २०-३० हजार धावा करु द्या, मग त्याची तुलना विराट कोहलीशी करा”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---