आयपीएल २०२२चा तेरावा सामना मंगळवारी (०५ एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झालेला हा सामना अतिशय रोमांचक राहिला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ३ बाद १६९ धावा केल्या. यादरम्यान राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने स्वस्तात बाद होत नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात (RCB vs RR) नाणेफेक जिंकून बेंगलोरने प्रथम गोलंदाजी निवडली होती. त्यामुळे राजस्थानकडून जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल ही ठरलेली सलामी जोडी मैदानात उतरली होती. मात्र दुसऱ्या षटकात ६ धावांवर असताना ही जोडी तुटली. बेंगलोरच्या डेविड विलीने युवा जयस्वालला वैयक्तिक ४ धावांवर त्रिफळाचीत करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ३७ धावा जोडल्या. मात्र तोही हर्षल पटेलचा शिकार ठरला.
त्यामुळे चौथ्या क्रमांकावर कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) फलंदाजीला आला होता. सॅमसनने कसलीही घाई न करता संथ गतीने फलंदाजीला सुरुवात केली होती. परंतु डावातील बारावे षटक टाकण्यासाठी आलेल्या वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवले. हसरंगाच्या षटकातील चौथ्या चेंडूवर सॅमसनने खराब फटका खेळला आणि हसरंगाने कसलीही चूक न करता संजूचा झेल टिपला.
अशाप्रकारे पुन्हा एकदा संजू हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. संजूने हसरंगाची शिकार ठरण्याची ही चौथी वेळ होती. यासह संजू हसरंगाच्या गोलंदाजीवर सर्वाधिकवेळ बाद होणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या नकोशा विक्रमात ऍरोन फिंच, दनुष्का गुनाथिला, सर्फराज अहमद आणि लिंडल सिमन्स संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. हे सर्व फलंदाज ३ वेळा हसरंगाच्या गोलंदाजीवर बाद झाले आहेत.
वानिंदू हसरंगाकडून सर्वाधिक वेळा बाद होणारे फलंदाज (Batsman to be dismissed most times by Hasaranga) :
४ वेळा – संजू सॅमसन*
३ वेळा – ऍरोन फिंच
३ वेळा – दनुष्का गुनाथिलका
३ वेळा – सर्फराज अहमद
३ वेळा – लिंडल सिमन्स
महत्त्वाच्या बातम्या-
जोस इज द बॉस! पुन्हा बनला ‘शतकवीर’, पण यावेळी धावांची नव्हे तर षटकारांची सेंच्यूरी; वाचा सविस्तर
मुंबई- पुणे प्रवासात सचिन तेंडुलकरचा ‘आम्ही डोलकर’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ