मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेतील १२ वा सामना सोमवारी(१९ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सुरु आहे. या सामन्यापूर्वी नाणेफेकीवेळी एक मजेदार घटना घडताना दिसली. नाणेफेक झाल्यानंतर मागील सामन्यांप्रमाणेच पुन्हा एकदा राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेकीचे नाणे उचलून स्वत:कडे घेतले.
नक्की काय झाले?
झाले असे की चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेकीचे नाणे वर उडवले. ते नाणे नाणेफेक जिंकणाऱ्या सॅमसनच्या जवळ पडले. ते पाहुन त्याने पटकन ते नाणे उचलले आणि स्वत: जवळ ठेवत लगेचच तो समालोचक सायमन डल यांच्याशी बोलण्यासाठी गेला आणि राजस्थान रॉयल्स प्रथम गोलंदाजी करेल असा निर्णय त्याने सांगितला.
यादरम्यान, त्याला नाणे उचलताना पाहून धोनीच्या चेहऱ्यावरही आश्चर्याचे भाव दिसले. मात्र, तो त्याला काही बोलला नाही, पण त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हसू असल्याचे दिसले.
#RR have won the toss and they will bowl first against #CSK at The Wankhede.
Follow the game here – https://t.co/gNnQUUgwcg #CSKvRR pic.twitter.com/Y5GNIPyfIq
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2021
सॅमसनने यापूर्वीही नाणे टाकले होते खिशात
यापूर्वी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यावेळीही सॅमसनने नाणेफेक झाल्यानंतर ते नाणे उचलून खिशात टाकले होते. त्यावेळी त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. या सामन्यानंतर सॅमसनने सांगितले होते की ते नाणे परत करावे लागले होते. त्याला सामनाधिकाऱ्यांनी नाणे ठेवण्याची परवानगी नसल्याचे सांगितले होते. तसेच सामन्यानंतर त्याला जेव्हा विचारण्यात आले की त्याने असे का केले, त्यावर तो म्हणाला होता की त्याला ते नाणे आवडले आहे.
पण सोमवारी सामनाधिकारी वेगळा असल्याचे पाहून त्याने नाणेफेकीचे नाणे पुन्हा उचलून स्वत:कडे ठेवले आहे. आता त्याला हे नाणे स्वत:कडे ठेवण्याची परवानगी मिळाली आहे की नाही, हा प्रश्न कायम आहे.
.@rajasthanroyals Captain @IamSanjuSamson wins the toss and elects to bowl first against #PBKS.
Follow the game here – https://t.co/WNSqxT6ygL #RRvPBKS #VIVOIPL pic.twitter.com/YhjX2T9MKZ
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2021
चेन्नईच्या १८८ धावा
या सामन्याच प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईने २० षटकात ९ बाद १८८ धावा केल्या आणि राजस्थानला १८९ धावांचे आव्हान दिले. चेन्नईकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. त्याच्यापाठोपाठ अंबाती रायडूने २७ आणि मोईन अलीने २६ धावांची आक्रमक खेळी केली. तसेच ड्वेन ब्रावोने नाबाद २० धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
राजस्थानकडून चेतन सकारियाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस मॉरिसने २ विकेट्स घेतल्या. तर राहुल तेवातिया आणि मुस्कफिजून रेहमान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
संधी असतानाही आंद्रे रसलने जेमिसनला रनआऊट न करण्यामागे ‘हे’ होते कारण?
आनंदाची बातमी! मुरलीधरनवरील शस्त्रक्रिया यशस्वी, लवकरच मिळणार डिस्चार्ज
समालोचन करताना सुनील गावसकरांनी केली मोठी चूक; बेन स्टोक्सने नाव न घेता ‘असे’ केले ट्रोल