जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते. तसेच भारतीय संघात भविष्याच्या दृष्टीने युवा खेळाडूंचा समावेश करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. आता त्याची सुरुवात भारताच्या टी20 संघापासून होणार असल्याचे संकेत मिळत आहे.
आगामी टी20 विश्वचषक पुढील वर्षी जून महिन्यात खेळला जाईल. आधीच्या नियोजनानुसार हा विश्वचषक अमेरिका व वेस्ट इंडीज येथे खेळला जाणार होता. मात्र, सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार हा विश्वचषक इंग्लंडमध्ये होऊ शकतो. या विश्वचषकासाठी बीसीसीआय हार्दिक पंड्या याला कर्णधार बनवू इच्छित आहे. यासोबतच सातत्याने संघात आत-बाहेर होत असलेल्या संजू सॅमसन याला वनडे व टी20 संघात मोठ्या काळासाठी संधी देत, उपकर्णधारपद देण्याविषयी बीसीसीआय विचार करत असल्याचे समजते.
संजू सॅमसन हा वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेपासून नियमितपणे भारतीय संघाचा भाग असेल. आगामी वनडे विश्वचषकासाठी देखील त्याचा विचार केला जाऊ शकतो. संजूने 2014 मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. मात्र, असे असताना देखील त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. सध्या आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल संघाचे नेतृत्व करतो. त्याच्या नेतृत्वात राजस्थान संघ चमकदार कामगिरी करताना दिसला आहे.
याव्यतिरिक्त टी20 संघात आयपीएल गाजवलेल्या अनेक खेळाडूंना संधी मिळू शकते. यामध्ये ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग व जितेश शर्मा ही नावे सामील आहेत. तसेच, बीसीसीआय वनडे विश्वचषानंतर मर्यादित षटकांच्या व कसोटी संघाच्या वेगवेगळ्या प्रशिक्षकांविषयी विचार करणार असल्याचे सांगितले जातेय.
(Sanju Samson Might Comeback In Team India And Become Vice Captain)
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा