बुधवारी (दि. 5 एप्रिल) गुवाहाटी येथे इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील आठवा सामना खेळण्यात आला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या स्पर्धेची सुरुवात विजयाने करणाऱ्या राजस्थानला या सामन्यात 5 धावांनी पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर संजू सॅमसन याने मोठी प्रतिक्रिया दिली. चला तर जाणून घेऊयात काय म्हणाला सॅमसन…
झाले असे की, या सामन्यात राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाने निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 197 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला डावाच्या मधल्या टप्प्यात संघर्ष करावा लागला. त्यांना यावेळी 20 षटकात 7 विकेट्स गमावत 192 धावाच करता आल्या. त्यामुळे पंजाबने हा सामना 5 धावांनी नावावर केला.
काय म्हणाला सॅमसन?
संजू सॅमसन (Sanju Samson) म्हणाला की, “खरं तर आम्ही चांगली सुरुवात केली होती. आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगला खेळ दाखवला होता. मधल्या षटकांमध्ये आम्हाला काही चौकार-षटकारांची अपेक्षा होता. मात्र, त्यांनी वास्तवात चांगली गोलंदाजी केली. मला वाटते की, इथे आमची लय जरा गडबडली होती.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “आम्ही रनरेट वाढूनही शेवटी चांगली कामगिरी केली आणि सामना नजीकचा बनवला. आम्हाला विजयासाठी फक्त एका षटकाराची गरज होती.”
सामन्यात कोण चमकलं?
या सामन्यात राजस्थानकडून फक्त कर्णधार संजू सॅमसन (42) आणि शिमरॉन हेटमायर (36) यांनाच चांगली कामगिरी करता आली. त्याच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पंजाबकडून कर्णधार शिखर धवन याने सर्वाधिक नाबाद 86 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त सलामीवीर प्रभसिमरन सिंग यानेही 60 धावांचे योगदान दिले. इतर एकाही फलंदाजाला 30 धावांचा आकडा पार करता आला नाही. दुसरीकडे, गोलंदाजीत पंजाबचा नेथन एलिस हा चमकला. त्याने राजस्थानच्या 4 विकेट्स नावावर केल्या. (sanju samson on losing game against punjab kings read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्वास रोखून धरा! ‘हा’ घातक वेगवान गोलंदाज आरसीबीच्या ताफ्यात होणार सामील, हेड कोचनेच केलीय पुष्टी
KKR vs RCB । जाणून घ्या कोणत्या संघाचे पारडे जड? ‘अशी’ आहे संभावित प्लेइंग इलेव्हन