कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२मधील ४७वा सामना झाला. कोलकाताने ७ विकेट्स राखून राजस्थानला या सामन्यात मात दिली. हा राजस्थानचा सलग दुसरा आणि हंगामातील चौथा पराभव होता. संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने प्रतिक्रिया दिली आहे. खेळपट्टी संथ होती आणि कोलकाताच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. तसेच राजस्थानचे फलंदाज १५-२० धावांनी मागे राहिल्याने आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला, असे सॅमसनला वाटते.
प्रथम फलदाजी करताना राजस्थानने (Rajasthan Royals) निर्धारित २० षटकांत ५ विकेट्सच्या नुकसानावर १५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताने १९.१ षटकातच ३ विकेट्सच्या नुकसानावर राजस्थानचे हे लक्ष्य पूर्ण केले. ज्यानंतर सॅमसनने (Sanju Samson) नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, आम्ही अजून १५-२० धावा करू शकलो असतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सॅमसन म्हणाला (Sanju Samson On Rajasthan Royals Defeat) की, “खेळपट्टी थोडी संथ होती. परंतु कोलकाताच्या गोलंदाजांची फार चांगली गोलंदाजी केली. ज्या प्रकारची गोलंदाजी आम्ही केली होती, त्याला पाहता आम्ही अजून थोडी फटकेबाजी करू शकलो असतो आणि सामना चांगल्या प्रकारे संपवू शकलो असतो. मला वाटते की, आम्ही १५-२० धावांनी मागे पडलो. मागील काही सामन्यांमध्ये थोड्या समस्या झाल्याने आता जरा चांगले वाटत आहे. चेंडूसोबत आम्ही भरपूर प्रयत्न केले. आम्ही खेळात भरपूर लढत पाहिली आहे आणि आमची ऊर्जा वास्तवात फार चांगली आहे.”
तसेच पुढे बोलताना सॅमसन म्हणाला की, “आम्हाला पुढील सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकावी लागणार आहे. आम्हाला खेळाला बारकाईने पाहावे लागणार आहे. तसेच आपल्यासोबत कोण फलंदाजी करत आहे, यावर लक्ष द्यावे लागेल. कोलकाताविरुद्ध चुकीच्या वेळी आम्ही विकेट्स गमावल्या. मला चांगली भागीदारी करायची होती. परंतु जेव्हा मी माझ्या फलंदाजीवर मेहनत घेण्यास सुरुवात केली, तेव्हा कोलकाताच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. परिणामी आम्ही आमचे शॉट्स मारू शकलो नाही.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सचा ‘हा’ धडाकेबाज फलंदाज म्हणतोय, ‘माझी पत्नीच माझी मोठी टीकाकार आणि कोच’
वडील करायचे सिलेंडर डिलेव्हरीचे काम, आता मुलगा आयपीएलमध्ये बनलाय केकेआरचा मॅच विनर
एसपी गोसावी मेमोरियल पुणे आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद: पीवायसी १ व पीवायसी २ यांच्यात विजेतेपदासाठी लढत