Loading...

लोकल बॉय संजू सॅमसनचे तिरुअनंतपुरम येथे झाले खास स्वागत, पहा व्हिडिओ

तिरुअनंतपुरम। आज(8 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दुसरा टी20 सामना पार पडणार आहे. हा सामना तिरुअनंतपुरम येथील ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.

Loading...

या सामन्यासाठी तिरुअनंतपुरमच्या विमानतळावर जेव्हा भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे आगमन झाले तेव्हा त्याचे तेथील चाहत्यांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले आहे. याचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्स संघाच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की सॅमसन विमानतळाच्या येथून भारतीय संघाच्या बसमध्ये बसण्यासाठी येत आहे. त्यावेळी आजूबाजूला उभे असणारे चाहते त्याच्या नावाचा गजर करत आहेत. यावेळी त्यानेही बसमध्ये चढल्यानंतर हात हलवून आणि हात जोडून चाहत्यांचे स्वागत स्विकारले.

तिरुअनंतरपुरमचे हे स्टेडियम सॅमसनचे घरचे मैदान आहे. त्यामुळे आता त्याला घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची आज संधी मिळणार का हे पहावे लागणार आहे.

Loading...

Loading...
Loading...

सॅमसनचा वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी सुरुवातीला भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र शिखर धवन मालिकेआधी दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याऐवजी सॅमसनला संधी देण्यात आली.

Loading...

You might also like
Loading...