---Advertisement---

राजस्थान रॉयल्समध्ये सॅमसनचीच सत्ता, मोडला अजिंक्य रहाणेचा मोठा विक्रम

Sanju-Samson-IPL
---Advertisement---

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात आयपीएल २०२२चा पहिला क्वालिफायर सामना खेळला गेला. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने ७ विकेट्सने विजय मिळवला आणि अंतिम सामन्यातील त्यांचे स्थान पक्के केले. आरसीबीचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने या सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. सॅमसनने या सामन्यात केलेल्या खेळीदरम्यान दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणेचा एक महत्वाचा विक्रम मोडीत काढला.

गुजरात टायटन्सविरुद्धच्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानसाठी सलामीवीर यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद झाला, पण जोस बटलर (Jos Buttler) आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या संजू सॅमसनने संघाला उत्कृष्ट सुरुवात दिली. संजू सॅमसन (Sanju Samson) आणि बटलरमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ६८ धावांची भागीदारी पार पडली.

सॅमसनने या सामन्यात २६ चेंडूत ४७ धावा केल्या. यादरम्यान, त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ३ षटकार निघाले. या ४६ धावांच्या जोरावर सॅमसनने राजस्थानचा माजी दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचा खास विक्रम मोडीत काढला. अजिंक्य रहाणे यापूर्वी राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होती, पण आता हा मान सॅमसनने मिळवला आहे. सॅमसनने आतापर्यंत राजस्थान रॉयल्ससाठी २८१२ धावा केल्या आहेत, ज्या सर्वाधिक आहेत.

राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये संजू सॅमसन आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे आहे, ज्याने राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना २८१० धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉटसन आहे, ज्याने २३७२ धावा केल्या आहेत. जोस बटलर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. बटलरने राजस्थान संघासाठी आतापर्यंत २१५९ धावा केल्या आहेत.

राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक आयपीएल धावा करणारे फलंदाज
२८१२ – संजू सॅमसन*

२८१० – अजिंक्य रहाणे
२३७२ – शेन वॉटसन
२१५९ – जोस बटलर

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

बटलर, सॅमसनच्या वादळी खेळींवर पाणी, गुजरातचा राजस्थानवर ७ विकेट्सने विजय, थेट अहमदाबादेत खेळणार फायनल

हे फक्त आयपीएलमध्येच होऊ शकतं!! एकाच चेंडूवर २ रनआऊट आणि ४ धावा, पाहा लास्ट बॉलचा सावळा गोंधळ

तुझसम तूच महान! धोनीवर कितीही टीका होऊदेत, पण प्रत्येक खेळाडूला त्याच्यासारखच बनायचंय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---