---Advertisement---

रणजी ट्रॉफीमध्ये झळकतोय संजू सॅमसन, झारखंड विरुद्ध पाडला षटकारांचा पाऊस

On: बुधवार, डिसेंबर 14, 2022 11:59 AM
Sanju Samson
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला राष्ट्रीय संघात स्थान मिळत नाहीये, पण हा खेळाडू प्रदर्शनात सातत्य दाखवत आहे. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात संजूने अर्धशतकीय डाव खेळला. तसेच दुसऱ्या सामन्यात रेेल्वेचा फिरकीपटू कर्ण शर्मा याने धमाकेदार गोलंदाजीचेे प्रदर्शन करत 8 गडी बाद केेले. पंजाबच्या प्रभसिमरन सिंग याने द्विशतक झळकावत चांगली सुरुवात केली.

संजू सॅमसन (Sanju Samson) याने झारखंड विरुद्ध खेळलेल्या सामन्यात 72 धावांची खेळी केेली. मात्र. त्याच्या या खेळीचे वैशिष्ट्य असे होतेे की, त्याने या डावात 7 षटकार आणि 4 चौकार लगावले. त्याच्या या खेळीमुळे केरळने झारखंड विरुद्ध पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 276 धावा केल्या होत्या. या सामन्यात केरळने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सॅमसन व्यतिरिक्त केरळच्या रोहन प्रेम (Rohan Prem) याने 79 धावा आणि रोहन कुन्नुमल याने 50 धावा केल्या. सचिन बेबी (Sachin Baby) आणि जलज सक्सेना (Jalaj Saxena) यांना भोपळाही फोडता आला नाही.

रणजी ट्रॉफीच्या सामन्यांचा आढावा
प्रभसिमरन याच्या द्विशतकामुळे पंजाबची स्थिती मजबूत
प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh) याचे द्विशतक (202 धावा) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याचे शतक (100 धावा) यांच्या जोरावर पंजाबनेे पहिल्या दिवशी चंदीगड विरुद्ध 3 गडी गमावत 363 धावा केल्या आहे.

कर्ण शर्मा याने 8 गडी बाद केले
रेल्वेचा फिरकीपटू कर्ण शर्मा (Karn Sharma) याने विदर्भाविरुद्ध 8 गडी बाद केले. विदर्भ संघ कर्णधार फैज फजल याच्या शतकाच्या जोरावर 213 धावा करण्यात यशस्वी झाला. कर्णधार फजल याने 219 चेंडूत 112 धावा केल्या. त्याने एका बाजूनेे संघाची धुरा सांभाळून ठेवली होती. मात्र, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाकडे कर्णच्या फिरकीचे उत्तर नव्हते. शेवटी फजल देखील कर्णच्या चेंडूवर बाद झाला. रेल्वेने दिवसाचा खेळ संपेर्यंत 1 गडी गमावत 22 धावा केल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अँड्र्यू फ्लिंटॉफच्या कारचा भीषण अपघात! हवाई मार्गाने रुग्णालयात दाखल
अवघ्या 15 वर्षांचं पोरगं गाजवणार आयपीएल लिलाव! अश्विनला मानतो आदर्श

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---