संजू सॅमसनला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकं झळकावण्याची सवयच लागली आहे. त्यानं शेवटच्या पाच डावांत तीन शतकं ठोकली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या सामन्यातही त्याच्या बॅटमधून शतक निघालं. मात्र त्याच्या खेळीदरम्यान एक धक्कादायक घटना घडली. सॅमसननं असा फटका मारला, की चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेच्या जबड्याला लागला. क्रिकेटचा चेंडू अतिशय भक्कम असतो. त्यामुळे महिलेला किती वेदना झाल्या असतील याची कल्पनाच करता येईल.
संजू सॅमसननं डावाच्या 10व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तेव्हा ट्रिस्टन स्टब्स गोलंदाजी करत होता. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर संजूनं पुढच्याच चेंडूवर षटकार मारला. मात्र चेंडू थेट स्टॅन्ड्समध्ये बसलेल्या महिलेच्या गालावर लागला. हा चेंडू तिला इतक्या जोरात लागला, की तिला गालावर बर्फ लावावा लागला. या घटनेनंतर कॅमेरा सॅमसनकडे वळला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरही काळजीचे भाव दिसत होते.
चेंडू लागल्यानंतर या महिला चाहतीचा रडण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता संजू सॅमसननं महिलेला स्वाक्षरी केलेली बॅट भेट देऊन तिचं सांत्वन करावं, अशी मागणी अनेकजण करत आहेत. दुसरीकडे, लाईव्ह मॅच पाहताना फोनवर चॅटिंग करणं ही चांगली गोष्ट नाही, असं म्हणत एका चाहत्यानं तिला ट्रोल केलं.
Sanju Samson hits a six & ball gets struck to a fan girl in stands 😳🤯
Tilak Verma also on Fire!#INDvSA
RAA PARIVAAR#DevDeepawali2024#BookNow_SabarmatiReport#Hindutvawadi_देवाभाऊ pic.twitter.com/Mbwv4l383E— Ravi Maithil (@Ravijha35) November 15, 2024
भारतीय संघानं चौथ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचा हा तिसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी भारतानं आयर्लंडचा 143 धावांनी तर न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला होता. सूर्यकुमार यादवनं त्याच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकण्याची हॅट्ट्रिक केली आहे. सूर्याच्या नेतृत्वाखाली भारतानं श्रीलंका आणि बांगलादेशचा 3-0 असा पराभव केला. आता दक्षिण आफ्रिकेचा 3-1 असा पराभव केला आहे.
हेही वाचा –
IND vs SA: संजू सॅमसन नाही तर या खेळाडूने केल्या सर्वाधिक धावा, जाणून घ्या कोणी सर्वाधिक विकेट घेतल्या?
शर्मा कुटुंबीयात छोट्या ‘हिटमॅन’चे आगमन, रोहित बनला दुसऱ्यांदा ‘बाबा’
टीम इंडियाने टी20 क्रिकेटमध्ये केला मोठा चमत्कार, पहिल्यांदाच घडले हे ऐतिहासिक विक्रम