आयपीएलची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर 19 सप्टेंबर रोजी या लीगची सुरुवात झाली. या लीगमध्ये बरेच विक्रम होतात. कुणी फलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करतो तर कुणी गोलंदाजीत. अशीच एक खेळी लीगच्या चौथ्या सामन्यात राजस्थान संघाचा युवा फलंदाज संजू सॅमसनने खेळला. त्याने मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध तुफानी फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले.
त्याने 32 चेंडूत 74 धावा केल्या. यात 9 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. त्याने 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. त्याच्या या खेळीमुळे राजस्थान संघाने चेन्नई संघाला 16 धावांनी पराभूत केले. सोशल मीडियावर त्याच्या बऱ्याच चर्चा आहेत. त्याच्या या खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाचा फलंदाज ऋषभ पंत शोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
रिषभ मागील काही महिन्यांपासून लयीत दिसलेला नाही. त्यामुळे त्याला भारतीय संघाच्या अंतिम ११ मधील जागाही गमवावी लागली होती. त्यामुळे आता त्याला भारतीय संघातील जागा टिकवून ठेवण्यासाठी केएल राहुल आणि संजू सॅमसन सारख्या खेळाडूंसह स्पर्धा करावी लागत आहे.
Steve Smith and umpire watching Sanju Samson's batting be like:#CSKvRR pic.twitter.com/3H9K2qJoJH
— Mojo Gagan (@Singhlicious) September 22, 2020
Rishabh Pant after watching Sanju Samson's inning pic.twitter.com/6631m0IR78
— Pratyush (@pratyushmanutd) September 22, 2020
Who Is Best Batsman ?
Retweet For Sanju Samson
Like For Rishabh Pant#CSKvsRR pic.twitter.com/0zJg7501d2
— Narendra Modi Fan (@narendramodi177) September 22, 2020
https://twitter.com/meme_ki_diwani/status/1308415951860379649?s=20
Sanju samson yet again proved
his worth . #RRvCSKGive him a chance in National side pic.twitter.com/VKOBZ4HG5i
— Vkholic.meme (@_vishaaaaal_) September 22, 2020
https://twitter.com/whos18plus/status/1308421282225098763?s=20
https://twitter.com/Lal_Jethiya2/status/1308425090950930433?s=20
https://twitter.com/Romeo_theboss/status/1308422858884907009?s=20
https://twitter.com/SharmaJi720/status/1308418065516965888?s=20
संजू सॅमसनच्या या तुफानी खेळी व्यतिरिक्त राजस्थानकडून कर्णधार स्टिव्ह स्मिथने ४७ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. तसेच शेवटच्या षटकात जोफ्रा आर्चरने तुफानी फलंदाजी केली. त्याने ८ चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. यामुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१६ धावा केल्या होत्या आणि सीएसकेला २१७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेला ६ बाद २०० धावाच करता आल्या.






