अवघ्या चार दिवसांमध्ये वनडे विश्वचषक 2023 हंगाम सुरू होणार आहे. वनडे फॉरमॅटमधील विश्वचषक म्हणजे क्रिकेटची सर्वात महत्वाची स्पर्धा मानली जाते. 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये ही स्पर्धा सुरू होईल. विश्वचषकापूर्वी संजू सॅमसन हे नाव चांगलेच चर्चेत राहिले. मात्र, सॅमसनला विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात निवडले गेले नाही. अशातच सॅमसन आणि शादाब खान यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.
भारताला आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे. या सामन्यात भारतीय संघापुढे बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान असेल. दुसरीकडे पाकिस्तानला आपला विश्वचषकातील पहिला सामना 6 ऑक्टोब रोजी नेदर्लंडविरुद्ध केळायचा आहे. सध्या विश्वचषकापूर्वीचे सराव सामने सुरू आहेत. संजू सॅमसन () याने 2015 साली भारतासाठी पदार्पण केले आहे. पण अद्याप त्याला संघात अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. वनडे विश्वचषक संघात निवड होण्यासाठी सॅमसनचे नाव चर्चेत होते. मात्र, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापानाने त्याला विश्वचषकात संधी दिली नाही.
विश्वचषक संघासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात आपली निवड झाली नाही, हे सॅमसनने स्वीकारल्याचे पाहायला मिळते. पाकिस्तानचा आष्टपैलू शादाब खान आणि सॅमसन यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोत सॅमसन आनंदात असून हसताना दिसत आहे. शादाब देखील हसत आहे. फोटोत मागच्या बाजूला आयसीसी वनडे विश्वचषकाचा पोस्टर आहे. असा अंदाज वर्तवला जात आहे की, हा फोटो विश्वचषकाच्याच एका कार्यक्रमातील आहे. फोटोवर चाहत्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.
Shadab Khan with Sanju Samson in a World Cup event.
– A beautiful picture. pic.twitter.com/HmL4aumUY1
— Johns. (@CricCrazyJohns) September 28, 2023
दरम्यान, विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांना आपल्या सर्वोत्तम 15 खेळाडूंपैकी प्लेइंग इलेव्हन निवडावी लागणार लागणार आहे. (Sanju Samson, who was left out of the World Cup squad, meets Pakistan’s all-rounder Shadab Khan)
विश्वचषकासाठी निवडलेले भारत आणि पाकिस्तान संघ –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपमधील सर्वात यशस्वी संघ टॉप 4मध्ये पोहोचला, तर…, भारतीय दिग्गजाने कुणाविषयी केले भाष्य?
वर्ल्डकपआधी विदेशी दिग्गजाने गायले श्रेयसचे गुणगान, म्हणाला,”तो टीम इंडियाचा…”