संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं आयपीएलच्या क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एलिमिनेटरमध्ये राजस्थाननं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 4 गडी राखून पराभव केला. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थानचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात संजूला कर्णधार म्हणून मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. हा सामना जिंकून संजू राजस्थान रॉयल्सचा सर्वात यशस्वी कर्णधार बनू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धचा विजय हा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील 31वा विजय होता. यासह संजूने अनुभवी शेन वॉर्नच्या विक्रमाची बरोबरी केली. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वॉर्नने 31 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला होता.
संजूला आता दिग्गज खेळाडू शेन वॉर्नला मागे टाकण्याची संधी आहे. हैदराबादविरुद्ध विजयाची नोंद करून संजू राजस्थानचा सर्वात यशस्वी कर्णधार बनेल. संजू आणि शेन वॉर्ननंतर राहुल द्रविडने राजस्थानसाठी 18 सामने जिंकले आहेत. तर स्टीव्ह स्मिथने त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थानला 15 सामन्यात विजय मिळवून दिला आहे.
29 वर्षीय संजू सॅमसन 2021 पासून राजस्थान रॉयल्स संघाचं नेत्तृत्व करत आहे. कर्णधारपदाची सुरुवात संजूसाठी खूपच खराब होती. संजूच्या नेत्तृत्वात राजस्थानला 14 सामन्यांपैकी फक्त 4 सामने जिंकता आले होते. त्यानंतर 2022 मध्ये राजस्थाननं जोरदार कमबॅक केला. त्यावेळी संजूच्या नेत्तृत्वात राजस्थाननं उपविजेता पद पटकावलं होतं.
एलिमिनेटरमधील आरसीबी विरुद्धच्या विजयानंतर संजू सॅमसन म्हणाला,”कधी वाईट दिवस असतात. तर नक्कीच चांगले दिवस येतात. पण आम्हाला आजचा सामना जिंकून विजय मिळवणे अत्यंत महत्वाचं होतं. कारण मागील 4-5 सामन्यात पराभावास सामोरे जावे लागले होते, परंतु आज ज्याप्रकारे आम्ही सामना खेळला, ज्याप्रकारे संघानं कामगिरी केली.त्यामुळे आनंदी आहे.”
महत्वाच्या बातम्या-
प्ले-ऑफमधील पराभवानंतर RCBच्या दिग्गजाची निवृत्तीची घोषणा, क्रिकेट वर्तुळातून….
आरसीबीच्या खराब कामगिरीवर कर्णधार डु प्लेसिसची प्रतिक्रिया, म्हणाला, “जेव्हा आम्ही मेदान…”
आरसीबीचं ट्रॉफीचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं, एलिमिनेटर सामन्यात राजस्थानचा रोमहर्षक विजय