---Advertisement---

इतिहासातील महागडा गोलंदाज ताफ्यात घेतल्याने बदलणार का राजस्थानचे नशीब? पाहा ‘ख्रिस मॉरिस’सह कसा आहे नवा संघ

On: शुक्रवार, फेब्रुवारी 19, 2021 7:00 PM
---Advertisement---

‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) या हंगामाचा मिनी लिलाव चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या लिलावापुर्वी संघनायक स्टिव्ह स्मिथला मुक्त करत राजस्थान रॉयल्सने सर्वांना अचंबित केले होते. त्यानंतर संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील या संघाने आयपीएल इतिहासातील सर्वोच्च बोली लावत आयपीएलप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिससाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्सबरोबर रस्सीखेच होत असताना राजस्थानने सर्वाधिक १६ कोटी २५ लाखांची बोली लावत त्याला गोटात सामील केले. यासह आयपीएलच्या १३ हंगामांच्या इतिहासातील विक्रमी बोली त्यांनी लावली आहे. याबरोबरच भारतीय युवा अष्टपैलू शिवम दुबेला ४.४० कोटींना विकत घेत संघाचे पारडे अजून जड केले आहे.

याखेरीज चेतन सकारिया, केसी कारिप्पा, आकाश सिंग, कुलदीप यादव या भारतीय खेळाडूंना तर मुश्तफिजुर रेहमान आणि लियाम लिविंगस्टोन या परदेशी खेळाडूंना राजस्थानने खरेदी केले आहे.

आयपीएल २००८ मध्ये चषकावर नाव कोरत राजस्थानने या लीगचा श्रीगणेशा केला होता. परंतु त्यानंतर एकदाही त्यांना अंतिम फेरी गाठण्यात यश आले नाही. अशात लिलावात दमदार खेळाडूंची निवड करत यंदा दुसऱ्यांदा चषक पटकावण्यासाठी राजस्थान संघाने जय्यत तयारी केली आहे.

राजस्थान रॉयल्स – २४ खेळाडू (८ परदेशी)

लिलावाआधी संघात कायम असलेले खेळाडू –
बेन स्टोक्स, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, डेविड मिलर, अँड्र्यू टाय, संजू सॅमसन, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट, यशस्वी जयस्वाल, मयंक मार्कंडे, कार्तिक त्यागी, अनुज रावत, रियान पराग, महिपाल रोमरोर, श्रेयस गोपाल, मनन वोहरा

लिलावात खरेदी केलेले खेळाडू – 
ख्रिस मॉरिस (१६.२५ कोटी), शिवम दुबे (४.४० कोटी), चेतन साकारिया (१.२० कोटी), मुश्तफिजुर रेहमान(१ कोटी), लियाम लिविंगस्टोन (७५ लाख), केसी कारिप्पा (२० लाख), आकाश सिंग (२० लाख), कुलदीप यादव (२० लाख)

महत्त्वाच्या बातम्या-

‘ग्लेन मॅक्सवेल’ला विक्रमी बोलीत खरेदी करत आरसीबी बनलाय आयपीएलचा ‘रॉयल’ संघ; पाहा कशी आहे किंग कोहलीची नवी टीम

मुंबई इंडियन्सचे ‘भविष्य’ म्हटले जात असलेला मार्को जेन्सन आहे तरी कोण?

आयपीएलच्या प्रत्येक हंगामात ‘या’ खेळाडूंची झाली चांदी, फ्रँचायझींनी ओतला पाण्यासारखा पैसा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---