भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा कालपासून (8 नोव्हेंबर) सुरू झाला. या दौऱ्यावर दोन्ही संघात 4 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्यातील पहिला सामना किंग्समीड, डर्बन या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखालील भारतीय संघाने 61 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. याच सामन्यात संजू सॅमसनने (Sanju Samson) शानदार शतक झळकावून इतिहास रचला. त्यावर सॅमसनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात उत्कृष्ट खेळीसाठी सामनावीर म्हणून निवड झालेल्या संजू सॅमसनने (Sanju Samson) संघाबद्दल हृदयस्पर्शी काहीतरी सांगितले आहे. तो म्हणाला की, संघाला स्वत:समोर ठेवण्याचा माझा हेतू नेहमीच आहे. संजूच्या या वक्तव्याने चाहत्यांची मने जिंकली.
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला की, “मी मैदानावर माझ्या वेळेचा खूप आनंद घेत आहे. मी चांगला खेळत आहे त्यामुळे मला माझ्या फॉर्मचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा होता. सर्व काही ठीक चालले आहे. मी संघाला नेहमीच स्वत:पेक्षा पुढे ठेवले आहे. जेव्हा आपण पहिले दोन बॉल खेळतो, तेव्हा आपण मोठे शाॅट खेळण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे गोष्टी सोप्या होतात, काहीवेळा तेच काम करते, तर कधी नाही. आज त्याचा फायदा झाला त्यामुळे मी आनंदी आहे.”
यानंतर सॅमसनने दक्षिण आफ्रिकेच्या संघाबद्दल सांगितले की, “त्यांना त्यांची घरची परिस्थिती माहित आहे, त्यांचा खरोखरच चांगला संघ आहे, त्यामुळे आमच्यासाठी विजयाने सुरुवात करणे महत्त्वाचे होते.”
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचे (Sanju Samson) त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे शतक आहे. जे त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झळकावले. याआधी त्याने बांगलादेशविरूद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यात शतक झळकावले होते. या खेळीनंतर सामनावीर पुरस्कारासह तो भारतासाठी सर्वाधिक टी20 सामनावीर पुरस्कार जिंकणारा यष्टीरक्षक बनला आहे.
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघातील दुसरा टी20 सामना (10 नोव्हेंबर) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या कसोटी संघात पुजारासाठी स्थान आहे, माजी खेळाडूने मोठे वक्तव्य!
भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआयची 6 तास मॅरेथाॅन मीटिंग, गंभीर, रोहित, आगरकर निशाण्यावर
IND vs SA; झंझावाती शतक झळकावून संजू सॅमसनने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू