---Advertisement---

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी या खेळाडूचे झाले ९ महिन्यांनी न्यूझीलंड संघात पुनरागमन

On: गुरूवार, जानेवारी 17, 2019 3:23 PM
---Advertisement---

23 जानेवारीपासून भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात 5 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. या वनडे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी न्यूझीलंडचा 14 जणांचा संघ जाहिर करण्यात आला आहे.

या वनडे संघात अष्टपैलू मिशेल सॅन्टेनरचे पुनरागमन झाले आहे. तो 2018 मध्ये गुडघा दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. या दुखापतीनंतर तो 2019 मध्ये श्रीलंका विरुद्ध एक टी20 सामना खेळला आहे. यात त्याला 1 विकेट घेण्यात यश आले होते. तो शेवटचा वनडे सामना मार्च 2018 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला आहे.

त्याचबरोबर टॉम लॅथम आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांचाही 14 जणांच्या न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. त्यांना श्रीलंकाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.

तसेच टॉड अस्टल आणि जिमी निशाम यांना छोटी दुखापत झाल्याने न्यूझीलंडच्या वनडे संघात संधी देण्यात आलेली नाही. पण त्यांचा शेवटच्या दोन वनडेसाठी विचार होऊ शकतो. पण त्यासाठी त्यांना देशांतर्गत क्रिकेटमधून त्यांचा फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.

त्याचबरोबर या संघाचे नेतृत्व केन विलियमसन करणार आहे. तसेच या संघात मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, टिम साऊथी असे अनुभवी खेळाडूही असणार आहेत.

ही मालिका मे महिन्यात इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

असा आहे न्यूझीलंडचा संघ – 

केन विलियमसन(कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डो ब्रासवेल, कॉलीन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्यूसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, हेन्री निकोलास, मिशेल सॅन्टेनर, इश सोधी, टिम साऊथी, रॉस टेलर.

महत्त्वाच्या बातम्या-

मेलबर्नला पोहचताच रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकने पाहिला या खेळाडूचा सामना

भारतात परतल्यावर हार्दिक पंड्याने स्वत:ला घेतले एका रुममध्ये कोंडून

Video: तिसऱ्या वन-डेसाठी ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने केला धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटचा सराव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment