इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. आता दोन्ही संघ मालिकेतील आपल्या पहिल्या विजयासाठी १२ ऑगस्टपासून क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर उतरतील. तत्पूर्वी, इंग्लंडने आपल्या संघामध्ये दुसऱ्या सामन्यासाठी एका युवा गोलंदाजाला सामील केले आहे. अनुभवी स्टुअर्ट ब्रॉड सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. या सामन्यात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
हा गोलंदाज झाला इंग्लंड संघात सामील
लोड से होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) युवा वेगवान गोलंदाज साकीब मेहमूद याला संघात सामील केले आहे. अनुभवी स्टुअर्ट ब्रॉड याचा सरावादरम्यान मांडीचा स्नायू दुखावला गेल्याचे सांगितले जात असून, त्याला कव्हर म्हणून मेहमूदला संधी देण्यात आली. मागील महिन्यात पाकिस्तान विरुद्ध टी२० मालिकेत शानदार कामगिरी केल्यानंतर मेहमूदला प्रथमच कसोटी संघात बोलावणे आले आहे. मेहमूदने आतापर्यंत ७ टी२० सामन्यात १४ तर, ९ वनडे सामन्यात ९ बळी आपल्या नावे केले आहेत.
या फिरकीपटूला केले संघाबाहेर
ईसीबीने सामन्यापूर्वी फिरकी गोलंदाज डॉम बेसला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. तो यॉर्कशायरसाठी आता खेळू शकतो. ईसीबीने यापूर्वीच फिरकी अष्टपैलू मोईन अली याला दुसऱ्या सामन्यासाठी संघात सामील केले आहे. पहिल्या सामन्यावेळी इंग्लंड संघात एकाही प्रमुख फिरकीपटूचा समावेश नव्हता.
लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-
रॉरी बर्न्स, डॉम सिब्ली, डॅन लॉरेन्स, जॉनी बेअरस्टो, जो रूट (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), ओली रॉबिन्सन, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, सॅम करन, साकीब मेहमूद, जेम्स अँडरसन, झॅक क्राऊली, हसीब हमीद, मार्क वूड व जॅक लिच.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीलमध्ये बदलाचे वारे, आयपीएल २०२२ साठी होणार ‘हे’ नवे बदल
नॉटिंघम कसोटीत भारत-इंग्लंड संघांनी मारून घेतली आपल्याच पायावर कुऱ्हाड, ‘या’ कारणासाठी झाला मोठा दंड