---Advertisement---

बंगालचे क्रिकेटर घेतायेत आर्मीकडून प्रशिक्षण, प्रशिक्षकाने सांगितले कारण

On: बुधवार, ऑगस्ट 11, 2021 5:57 PM
---Advertisement---

बंगाल क्रिकेट असोसिएशनने आगळा वेगळा निर्णय घेतला आहे. बंगालच्या 23 वर्षांखालील संघाने खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी ‘फोर्ट विल्यम’ येथे भारतीय सैन्याकडून प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनने प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये, 23 वर्षांखालील संभाव्य खेळाडू फोर्ट विल्यम येथे इस्टर्न कमांडमध्ये लष्करी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेताना दिसले.

दहा दिवसांच्या सत्रात संघातील संभाव्य खेळाडू दोन गटांमध्ये प्रशिक्षण घेतील. या संघाचे प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला म्हणाले, “आम्ही येथील लष्करी जवानांना विनंती केली आणि त्यांनी लगेच क्रिकेटपटूंना प्रशिक्षित करण्यास सहमती दर्शवली.”

भारताचे माजी खेळाडू लक्ष्मी रतन शुक्ला म्हणाले, “कौशल्यावर काम करता येते, यावर माझा नेहमीच विश्वास होता, पण यासाठी मानसिक शक्ती आणि शारीरिक प्रशिक्षण वाढवावे लागते.” बंगालच्या माजी कर्णधाराने सांगितले की, मानसिक सामर्थ्य हे फलंदाज किंवा गोलंदाजाला कठीण सत्र पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते. यासाठी खेळाडूंना मजबूत करण्यासाठी भारतीय लष्करापेक्षा चांगले कोण आहे?
बंगाल क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या या निर्णयाचे समाजमाध्यमावर सकारात्मक प्रतिसाद उमटत आहेत.

लक्ष्मी रतन शुक्ला यांची गेल्या महिन्यातच बंगालच्या 23 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षक बनताच शुक्लाने खेळाडूंसाठी कडक नियम लागू केले आहेत. यामध्ये सोशल मीडियापासून दूर राहणे आणि लांब केस न ठेवणे, असे नियम समाविष्ट आहे. या व्यतिरिक्त, संघात एकी राखण्यासाठी खेळाडूंना बंगाली शिकावी लागेल. भारतासाठी 3 एकदिवसीय आणि आयपीएल खेळलेले शुक्ला राजकारणातील कारकिर्दीनंतर पुन्हा सहा वर्षांनी क्रिकेटमध्ये परतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानचे पानिपत करणारा ‘तो’ गोलंदाज लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडच्या ताफ्यात

आयपीलमध्ये बदलाचे वारे, आयपीएल २०२२ साठी होणार ‘हे’ नवे बदल

लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंड संघात सामील झाला ‘हा’ अष्टपैलू क्रिकेटपटू, मिळू शकते प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---