---Advertisement---

राशिद खानच्या जबरा ‘हेलिकॉप्टर शॉट’ने परदेशी क्रिकेटरला लावले वेड; म्हणाली, “मलाही शिकव”

On: सोमवार, फेब्रुवारी 22, 2021 3:53 PM
---Advertisement---

माजी भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनी याचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात सापडतात. धोनीएवढेच त्याच्या स्पेशल हेलिकॉप्टर शॉटचेही पुष्कळ चाहते आहेत. अगदी गल्लीबोळात क्रिकेट खेळणाऱ्या चिमुकल्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूही त्याचा हा शॉट खेळण्याचा प्रयत्न करतात.

नुकत्याच पाकिस्तान सुपर लीग २०२१ च्या एका सामन्यात अफगानिस्तानचा खेळाडू राशिद खानने हा शॉट खेळला आहे. सध्या त्याच्या या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. अशात इंग्लंडची माजी महिला यष्टीरक्षक सारा टेलर हिलादेखील राशिदच्या हेलिकॉप्टर शॉटची भुरळ पडली आहे.

सारा टेलरने केली राशिद खानच्या शॉटची प्रशंसा

त्याचे झाले असे की, रविवारी (२१ फेब्रुवारी) पेशावर जालमी विरुद्ध लाहोर कलंदर्स यांच्यात पीएसएल २०२१चा दुसरा सामना झाला. या सामन्यात राशिद प्रतिनिधत्त्व करत असलेल्या लाहोर कलंदर्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. त्यामुळे विरोधी पेशावर जाली संघाने प्रथम फलंदाजी करताना १४१ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात लाहोर कलंदर्सने १८ व्या षटकापर्यंत ६ बाद १३३ धावा केल्या. त्यानंतर १९ व्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव राहिला. तर दुसऱ्या चेंडूवर राशिदने चौकार खेचला.

आता लाहोर कलंदर्सला विजयासाठी फक्त ४ धावांची आवश्यकता होती. अशात अमद बट्टच्या १९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर राशिदने गुडघ्यावर बसत जबरदस्त हेलिकॉप्टर मारला आणि खणखणीत षटकार जडला. यासह लाहोर कलंदर्सनी ४ विकेट्सने सामना खिशात घातला. यानंतर राशिदच्या हेलिकॉप्टर शॉटचे सोशल मीडियावर चोहोबाजूंनी कौतुक होत होते.

अगदी साराही राशिदच्या शॉटचे कौतुक करण्यापासून स्वत:ला थांबवू शकली नाही. तिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हिडिओला प्रतिक्रिया देत ‘मलाही तुझ्यासारखा हेलिकॉप्टर शॉट मारायला शिकायचा आहे’, असे म्हटले आहे.

https://twitter.com/Sarah_Taylor30/status/1363508789966733315?s=20

आयपीएल २०२१ मध्ये हैदराबादचे करणार प्रतिनिधित्त्व

पीएसएल २०२० नंतर राशिद आयपीएलचा आगामी हंगामही गाजवताना दिसणार आहे. त्याच्या सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला लिलावापुर्वीच संघाल कायम ठेवले होते. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही तो हैदराबादचे प्रतिनिधित्त्व करताना दिसेल. अशात पीएसएलमधील चांगल्या फॉर्मचा राशिदला आयपीएल २०२१ मध्येही फायदा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अन् ‘तिला’ पाहून सूर्यकुमार झाला क्लीन बोल्ड! अशी आहे ‘लव्हस्टोरी’

INDvsENG: संघनायकाची सुट्टी! टी२० बरोबर वनडे मालिकेतूनही जो रूट होणार बाहेर

INDvsENG: भारतीय टी२० संघात नको होते ‘हे’ तीन चेहरे, दुसरा आहे जबरदस्त फॉर्ममध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---