भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर हा सध्या पत्नी अंजली, मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांच्यासोबत इंग्लंडमध्ये आहे. त्याने आपल्या सुट्ट्या वाढवल्या असून साराने त्यांचे काही लंडनमधील काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. त्यातील काही फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
अर्जून हा आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) दरम्यान चर्चेत आला होता. त्याचे आयपीएलमध्ये पदार्पण झाले नाही. लंडनमधील एक स्टोरी साराने इंन्स्टाग्रामवर शेयर केली आहे. त्यामध्ये सारा आणि अर्जून यांनी बॉलीवूडमधील प्रसिद्ध सर्किट-मुन्नाभाई या जोडीचे रुप घेतले आहेत. त्यातील सारा सर्किट तर अर्जून मुन्नाभाईच्या रुपात दिसले आहेत.
साराला भटकंतीची फार आवड आहे, हे तिच्या सोशल मिडियाच्या अकाउंटवरून दिसून येते. तिच्या पोस्ट भरपूर जणांना आवडत असून तिच्या पोस्टला खूप लाईक्सही असतात. ती नेहमी तिच्या वेशभुषेत बदल करत असते. ती आयपीएलच्या काळातही खूप चर्चेत आली होती. तसेच तिने मुंबई इंडियन्सच्या अनेक सामन्यांना हजेरीही लावली आहे.
अर्जुनला यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तर पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता आहे. तो मुंबई संघासोबत दोन वर्षे असून त्याला आजपर्यंत एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असणाऱ्या अर्जुनला प्रथम श्रेणीचे सामने खेळण्याचीही संधी मिळाली नाही. त्याने फक्त २ टी२० सामने खेळले असून २ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मुंबईकडून २०२१मध्ये सईद मुश्ताक अली ट्रॉफीचा सामना खेळला आहे. या सामन्यात त्याने ३ षटके टाकताना ३३ धावा देत १ विकेट घेतली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WIvIND: यजमानांचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय; जडेजा बाहेर, श्रेयस उपकर्णधार
WIvsIND: सामन्याअगोदरच कॅप्टन ‘धवन’च्या रागाचा चढला पारा! पत्रकार परिषदेत बोलून गेला असे काही..