आयपीएल 2023 चा 22वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. उभय संघांतील हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या दोन पराभवानंतर पुन्हा एकदा विजयी मार्गावर परतत मुंबईने सलग दुसरा विजय आपल्या नावे केला. या सामन्यात अनेक बडे खेळाडू खेळताना दिसले असले तरी सर्वाधिक चर्चा सचिन तेंडुलकरची मुलगी सारा व केकेआरचा मालक शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान यांची झाली.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने पदार्पण केले. आपल्या भावाला पाठिंबा देण्यासाठी त्याची बहीण सारा ही देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. दुसरीकडे केकेआरचा संघमालक शाहरुख खान याची मुलगी सुहाना हिनेदेखील स्टेडियममध्ये हजेरी लावली. सोशल मीडियावर देखील या दोघींच्या उपस्थितीची जोरदार चर्चा रंगली.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1647572416242290688?t=2bwq1B6zw9RFd03tMZBQaA&s=19
एका ट्विटर वापरकर्त्याने लिहीले,
‘हे खरे युद्ध तारा मंडळातील दोन राण्यांमधील आहे’
https://twitter.com/_VishwajitPatil/status/1647571137608695810?t=pjTCyK6FdGAp7mbi-or7qw&s=19
या सामन्याचा विचार केल्यास मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. केकेआरसाठी या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरने शतक झळकावले. त्याने 104 धावांची खेळी केली. त्याला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ न मिळाल्याने केकेआर 184 धावापर्यंतच पोहोचू शकला. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला रोहित शर्मा व ईशान किशन यांनी 65 धावांची दमदार सलामी दिली. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा व टीम डेव्हिड यांनी आक्रमक खेळ करत संघाला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. मुंबईचा हा सलग दुसरा विजय तर केकेआरचा सलग दुसरा पराभव ठरला.
(Sara Tendulkar And Suhana Khan Treding On Social Media While Mumbai Indians And KKR Match At Wankhede Stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हायवोल्टेज’ सामन्यात राजस्थानने जिंकली नाणेफेक! गुजरातला फलंदाजीचे आमंत्रण, अशा आहेत प्लेईंग इलेव्हन
“यशाचे क्रेडिट घेतो तशी पराभवाची जबाबदारी घे”, दिल्लीच्या पराभवानंतर पॉंटिंगवर दिग्गजाचे शरसंधान






