---Advertisement---

हाच होणार सचिन तेंडुलकरचा जावई? पाहा कोणासोबत जोडलं जातंय साराचं नाव

On: शनिवार, सप्टेंबर 26, 2020 6:01 PM
---Advertisement---

जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी टी२० लीग आयपीएलच्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. यातील ७ सामने आतापर्यंत झाले आहेत. यातील ५ वा सामना बुधवारी (२५ सप्टेंबर) आबु धाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्सने ४९ धावांनी जिंकला. या सामन्याचा व्हिडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर ठेवला होता. ज्यात युवा फलंदाज शुबमन गिल क्षेत्ररक्षण करताना दिसत होता. या पोस्टमुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधान आले आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने केलेल्या ८० धावांमुळे मुंबई इंडियन्सने ५ विकेट्स गमावत मोबदल्यात १९५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ १४६ धावाच काढू शकला. मुंबईचा या हंगामातील हा पहिलाच विजय होता.

या सामन्यात केकेआरचा सलामीवीर शुबमन गिलला काही विशेष कामगिरी करता आली नव्हती. तो अवघ्या ७ धावांवर बाद झाला होता.

https://twitter.com/tushtea/status/1309036195259744258

यापूर्वीही शुबमन गिलने इंस्टाग्राम अकॉउंटवरून एक फोटो शेअर केला होता. त्याने त्याच्या फोटोला जे शीर्षक दिले होते सारानेही तेच शीर्षक तिच्या शेअर केलेल्या फोटोला दिले होते. त्यावेळीसुद्धा दोघांच्या अफेअरची अफवा समोर आली होती.

https://twitter.com/ViratSzn/status/1308785087362682880

शुबमनने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्याने पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---