इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामातील साखळी फेरीतील सर्व सामने संपले आहेत. आता प्लेऑफची फेरी सुरू होईल. दरम्यान, साखळी फेरीत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या संघांमध्ये मुंबई इंडियन्सचा देखील समावेश आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संध असलेल्या मुंबईला आयपीएलच्या १५ व्या हंगामात १४ पैकी केवळ ४ सामने जिंकता आले. त्यामुळे त्यांना गुणतालिकेतही सर्वात अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, या संपूर्ण हंगामात मुंबईने अर्जुन तेंडुलकर याला पदार्पणाची संधी दिली नाही.
अर्जुनला मिळाली नाही पदार्पणाची संधी
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) २०२१ पासून मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) भाग आहे. या २१ वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटूला मुंबईने आयपीएल २०२२ साठी (IPL 2022) ३० लाखांमध्ये खरेदी केले होते. पण त्याला अद्याप आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली नाही. मुंबईने यंदा तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविससारख्या अनेक युवा क्रिकेटपटूंना आयपीएल पदार्पणाची संधी दिली. त्यामुळे अनेक चाहत्यांना वाटले होते की, अर्जुनला देखील अंतिम ११ जणांमध्ये खेळण्याची संधी मिळेल.
अर्जुन अनेकदा नेटमध्ये जोरदार सराव करतानाही दिसून आला होता. त्यामुळे अनेकांनी त्याच्या आयपीएल पदार्पणाच्या आशा व्यक्त केल्या होत्या. मात्र, मुंबई संघव्यवस्थापनाने त्याला एकाही सामन्यात खेळवले नाही. अर्जुन हा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या खेळाबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
दरम्यान, आयपीएल २०२२ मधील मुंबईने अखेरचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला. या सामन्यादरम्यान अर्जुन अंतिम ११ जणांच्या संघातून बाहेर असल्याने बाऊंड्री लाईनजवळ संघातील इतर खेळाडूंना मदत करताना दिसला. या सामन्यासाठी अर्जुनची मोठी बहिण सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. यावेळी तिने आपल्या भावासाठी एक भावून इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली होती.
साराने बाऊंड्री लाईन जवळ असलेल्या अर्जूनला कॅमेरात कैद करत ‘अपाना टाईम आयेगा’ हे गाणे इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. त्यामुळे तिची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली.
अर्जुनबद्दल सांगायचे झाले, तर तो डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. वेगवान गोलंदाजी ही त्याची प्रमुख शैली असून तो खालच्या तळात फलंदाजीमध्येही योगदान देऊ शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची
आजपासून सुरू होतोय महिला आयपीएलचा थरार, जाणून घ्या कुठे आणि कधी होणार सामने
चार वर्षात आयपीएलचे विजेते बदलले, पण पंजाबने आपली जागा नाही सोडली; पाहा काय केलाय पराक्रम