भारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगने आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली आहे. 350 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलेल्या सिंगने नुकत्याच झालेल्या एशियन गेम्समध्ये संघाच्या वाईट कामगिरीमुळे निवृत्ती घेण्याचे ठरवले. यामध्ये संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
“मी 12 वर्षे या संघाकडून खेळलो. आता वेळ आली आहे पुढच्या पिढीला संधी द्यायची”, असे 32 वर्षीय सिंग म्हणाला.
सरदार सिंगने 2003-04ला पोलंड दौऱ्यावेळी कुमार गटात तर 2006ला पाकिस्तान विरुद्ध वरिष्ठ गटात पदार्पण केले होते. तसेच त्याने दोन ऑलिंपिक स्पर्धेत संघाचे नेतृत्व केले आहे.
तसेच सर्वात कमी वयाचा भारतीय कर्णधार असल्याचा मानही सिंगकडेच आहे. त्याने 2008-16 यादरम्यन संघाचे नेतृत्व केले आहे. त्याला 2012 साली अर्जुन आणि 2015 साली पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.
गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी सिंग संघात नव्हता. मात्र त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पुनरागमन करताना संघाला रौप्य पदक मिळवण्यास मदत केली.
एशियन गेम्सच्या आधी झालेल्या यो-यो टेस्टमध्ये सिंग बाकीच्यापेक्षा फिट होता. यामध्ये त्याने स्वत:हाचा 21.3 गुणांचा विक्रम मोडत 21.4 गुण मिळवले तसेच यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकले.
“मी आणखी दोन वर्षे हॉकी खेळू शकतो. पण काही वेळा आपल्याला दुसऱ्या गोष्टींचाही विचार करावा लागतो. म्हणूनच मी ठरवले की हीच योग्य वेळ आहे निवृत्ती घेण्याची”, असे हरियाणा पोलिस डीएसपी सिंग म्हणाला.
“हा निर्णय घेण्याअगोदर मी भारतीय हॉकी प्रशिक्षक हरेंद्र सिंग याच्यांशी चर्चा केली. त्यांनी माझ्या या निर्णयाला होकार दिला.”
“हॉकी हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग असून माझ्यासाठी तो खुप महत्त्वाचा आहे. पण हरियाणा पोलिस विभागात मी माझे काम सुरूच ठेवणार आहे.”
एशियन गेम्सच्या उपांत्य फेरीत मलेशियाकडून पराभूत झाल्याने भारतीय संघाला 2020 टोकियो ऑलिंपिकला पात्र होणे कठीण झाले आहे. तसेच आता सिंगच्या निवृत्तीमुळे संघाच्या अडचणी अजून वाढल्या आहेत.
सरदार सिंग 2014 इंचेऑन एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकलेल्या संघात होता. तसेच त्याने संघाला 2010 आणि 2014ला राष्ट्रकुल स्पर्धेत दोन रौप्य पदके मिळवून दिली आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–काय आहे मॅकग्राचे अँडरसनला नवीन आव्हान?
–कूक-पीटरसनमध्ये मैत्रीचे नवे पर्व?
–क्रिकेटकडून टेनिसकडे वळालेल्या ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूने मिळवले युएस ओपनचे विजेतेपद