कोरोना व्हायरसच्या संकटामुळे क्रीडा क्षेत्रालाही मोठा धक्का बसला होता. गेल्या दोन वर्षात रणजी ट्रॉफी स्पर्धाही झाली नव्हती. पण अखेर यावर्षी भारतातील मानाची रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात येत आहे. नुकताच रणजी ट्रॉफी २०२२ स्पर्धेतील पहिला टप्पा पार पडला आहे. हा पहिला टप्पा मुंबईचा २४ वर्षीय फलंदाज सर्फराज खानने गाजवला आहे.
त्याने २०१९-२० सालच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) हंगामातीलच आपला फॉर्म कायम ठेवत धावांचा पाऊस पाडला आहे. रणजी ट्रॉफी २०२२ हंगामातील पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघाचे तीन सामने पार पडले. सर्फराजने (Sarfaraz Khan) मुंबईकडून तीन सामने खेळताना या स्पर्धेत आत्तापर्यंत १३७.७५ च्या सरासरीने ५५१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या दोन शतकांचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याची २७५ धावा ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली आहे.
रणजी ट्रॉफी २०२२ मध्ये आत्तापर्यंत सर्फराजपेक्षा केवळ बिहारच्या सकिबुल गनीने जास्त धावा केल्या आहेत. त्याने एका त्रिशतकासह ६०१ धावा केल्या आहेत.
गेल्या १२ डावात जवळपास १६० च्या सरासरीने धावा
सर्फराज रणजी ट्रॉफीमध्ये गेल्या हंगामापासून तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने २०१९-२० हंगामात ६ सामन्यातील ९ डावात १५४.६६ सरासरीने ९२८ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या २ द्विशतकांचा आणि १ शतकाचा समावेश होता. ही एका रणजी हंगामातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक सरासरी होती.
त्यामुळे सर्फराजच्या गेल्या १२ रणजी डावांचा विचार करायचा झाल्यास त्याने तब्बल १६३.४४ च्या सरासरीने १४७१ धावा केल्या आहेत. यात त्याने १ त्रिशतक, २ द्विशतक आणि २ शतके केली आहेत. तसेच तीन अर्धशतकेही त्याने झळकावली. त्याने या १२ डावांत ७१, ३६, ३०१*, २२६*, २५, ७८, १७७, ६, २७५, ६३, ४८ आणि १६५ अशा खेळी केल्या आहेत. त्याच्या याच कामगिरीमुळे तो सातत्याने भारतीय संघाचे दार ठोठावत आहे. अद्याप त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
Alexa, please play 𝙐𝙣𝙨𝙩𝙤𝙥𝙥𝙖𝙗𝙡𝙚 🎶🔥
1️⃣ triple century, 2️⃣ double tons, 2️⃣ daddy 💯s and 3️⃣ more 50+ scores in just the last 1️⃣2️⃣ #RanjiTrophy innings for Sarfaraz Khan 🤯#YehHaiNayiDilli pic.twitter.com/Hvf6kqVN1D
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 5, 2022
मुंबई उपांत्यपूर्व फेरीत
सर्फराजच्या कामगिरीच्या जोरावर मुंबई संघाने रणजी ट्रॉफी २०२२ हंगामात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईने या हंगामात एक सामना जिंकला आहे आणि २ सामने अनिर्णित राहिले आहेत.
आयपीएलमध्ये सर्फराज दिल्ली संघात
फेब्रुवारीमध्ये आयपीएल २०२२ हंगामाचा लिलाव पार पडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिलावात सर्फराजवर मोठी बोली लागली नाही. अनेक संघांनी त्याला पसंतीही दिली नाही. पण अखेर त्याच्या २० लाख या मुळ किंमतीत त्याला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात घेतले. त्यामुळे तो आपीएल २०२२ हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘मुलाखत घेताना मला खेळाडूंची भिती वाटायची, ते मला…’, स्पोर्ट्स अँकरचा क्रिकेटपटूंबद्दल मोठा खुलासा
महान फलंदाज गावसकरांनी शेन वॉर्नबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य; भडकली ऑस्ट्रेलियन मीडिया