युवा फलंदाज सरफराज खाननं बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावलं. तो या सामन्यात 195 चेंडूत 150 धावा करून बाद झाला. सरफराजला अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर यावर्षी भारतीय संघात संधी मिळाली. आता त्यानं शतक ठोकून निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
या शतकानंतर सरफराज खान चांगलाच चर्चेत आला आहे. यावर आता माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी मोठं वक्तव्य केलं. 1980 च्या दशकातील जावेद मियांदादला 2024 मध्ये पाहायचं असेल तर सरफराज खानला पाहू शकता, असं मांजरेकर म्हणाले. सरफराज खानच्या खेळण्याच्या शैलीबाबत संजय मांजरेकर यांनी त्याचं 2024 मधील जावेद मियांदाद असं वर्णन केलं.
‘ईएसपीएन क्रिकइन्फो’वर बोलताना संजय मांजरेकर म्हणाले, आपण 1980 मध्ये जावेद मियांदादला खेळताना पाहायचो. आता आपण सरफराज खानला पाहत आहोत. सरफराज खानचा खेळ पाहता, तो 2024 चा जावेद मियांदाद असल्याचं वाटतं. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांची गणना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या मॅच विनर खेळाडूंमध्ये केली जाते. या क्रिकेटपटूनं आपल्या फलंदाजीनं पाकिस्तानला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. क्रिकेटला अलविदा केल्यानंतर मियांदाद कोचिंगशी जोडले गेले. ते सध्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक आहेत.
बंगळुरू कसोटीत सरफराज खान 195 चेंडूत 150 धावा करून बाद झाला. आपल्या या खेळीत त्यानं 18 चौकार आणि 3 षटकार मारले. सरफराजनं रिषभ पंतसोबत सहाव्या विकेटसाठी 177 धावांची भागिदारी केली. या दोघांच्या भागिदारीनं टीम इंडिया डावाच्या पराभवापासून वाचली आहे. रिषभ पंत 105 चेंडूत 99 धावा करून बाद झाला. त्याचं 7वं कसोटी शतक अवघ्या एका धावेनं हुकलं.
हेही वाचा –
हर्टब्रेक..!! रिषभ पंतचं शतक अवघ्या 1 धावेनं हुकलं, पुन्हा एकदा ठरला नर्व्हस नाईन्टीजचा बळी
ind vs nz; विराट कोहलीच्या बालेकिल्ल्यात हिटमॅनच्या नारा, पाहा VIDEO
सरफराजनं विचित्र पद्धतीनं उड्या मारून पंतला आऊट होण्यापासून रोखलं, मैदानातील मजेशीर VIDEO व्हायरल