मागच्या तीन रणजी ट्रॉफी हंगांमांमध्ये आपल्या सातत्यपूर्ण प्रदर्शनामुळे सरफराज खान नेहमीच चर्चेत राहिला. पण भारतीय संघाकडून कसोटी पदार्पणाची संधी त्याला अद्याप मिळाली नाही. असे असले तरी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागच्या तीन हंगामांत 100च्या सरासरीने धावा करणारा सरफराज पुढच्या सामन्यात भारतीय संघासाठी खेळताना दिसू शकतो.
भारतीय संघ (Team India) सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहेत. सरफराज खान (Sarfaraz Khan) इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघासोबत आहे. केएल राहुल दुखापतीमुळे सध्या खेळत नाहीये. मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर तिसऱ्या सामन्यातूनह राहुलचा पत्ता कट होण्याची पूर्ण शक्यता आहे. अशात सरफराज खानला संधी मिळण्याची दाड शक्यता आहे. हा त्याचा भारतासाठी पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना असेल.
भारतीय संघाचे मध्यक्रमातील दोन फलंदाज संध्या दुखापतीमुळे बाहेर आहेत. केएल राहुलप्रमाणेच श्रेयस अय्यर यालाही दुखापतीमुळे विश्रांती दिली गेली आहे. असे असले तरी, अय्यरला संघातून बाहेर ठेवण्याची नेमके कारण बीसीसीआयकडून सांगण्यात आले नाहीये. खराब फॉर्ममध्ये देखील त्याला बाहेर बसवले जाण्याची शक्यता होती. इंडियन एक्सप्रेसने एका सुत्राच्या हवाल्याने असे सांगितले आहे की, “सरफराज खान डेब्यू करणार आहे. कारण केएल राहुल या कसोटी सामन्यात बाहेर झाला आहे. अशात सरफराजला आपला पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळेल.”
युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) यालाही राजकोट कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळू शकते. यष्टीरक्षक फलंदाज केएस भरत (KS Bharat) बॅटने मागच्या दोन्ही सामन्यात सुमार खेळी करताना दिसली. याच पार्श्वभूमीवर जुरेलला देखील सरफराजसोबत कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते.
दरम्यान, भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हादेखील सध्या संघासोबत नाहीये. विराटने वैयक्तिक कारण सांगत सुरुवातील मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधून माघार घेतली. पण शनिवारी (10 फेब्रुवारी) मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघ घोषित झाला, तेव्हा विराटने संपूर्ण मालिकेतून माघर घेतल्याचे समोर आले. रविंद्र जडेजा मालिकेतील तिसऱ्या कसोटीत खेळेल, याचीही कुठलीच खात्री देता येणार नाहीये. (Sarfaraz Khan will make his Test debut! The fate of the young player will shine in the Rajkot Test)
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, रविंद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप
महत्वाच्या बातम्या –
‘त्या घटनने माझ्या कुटुंबावर परिणाम झाला…’, पाचव्या शतकानंतर मॅक्सवेलकडून वाईट अनुभवाचा उल्लेख
IND vs ENG : राजकोटच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट समोर; अश्विन-जडेजाच्या तालावर नाचणार इंग्लंड