भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सध्या एकाच खेळाडूचा बोलबाला सुरू आहे. त्याने रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी याच्यानंतर इराणी कप (Irani Cup)या स्पर्धेमध्ये त्याच्या कामगिरीत सातत्य राखत धावांचा पाऊस पाडला आहे. इराणी कपमध्ये सौराष्ट्र विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया (Saurashtra vs Rest of India)यांच्यात सामना सुरू आहे. यामध्ये रेस्ट ऑफ इंडियाच्या पहिल्या डावात सरफराज खान याने शतकी खेळी केली आहे. त्याने 138 धावा करताना सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे.
सरफराज खान (Sarfaraz Khan) यावर्षी स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आणि आता इराणी चषकाच्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली आहे. यामुळे तो भारताच्या कसोटी संघासाठी उत्तम पर्याय ठरत आहे. 24 वर्षाच्या या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अक्षरश धावांचा रतीब घातला आहे. त्याने 29 सामन्यांच्या 43 डावांमध्ये 81.33च्या सरासरीने 2928 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतके आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. ही कामगिरी करताना त्याने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले आहे.
ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांनी 22 सामन्यांच्या 43 डावांमध्ये खेळताना 2927 धावा केल्या होत्या. यामुळे प्रथम श्रेणीमध्ये पहिल्या 43 डावांमध्ये एका धावेने सरफराज पुढे आहे. ब्रॅडमन यांनी 83.63च्या सरासरीने धावा करताना 12 शतके आणि 9 अर्धशतके केली, मात्र त्यांनी कमी सामन्यांमध्ये एवढ्या धावा केल्याने सरफराज सरासरीच्या बाबतीत मागे राहिला आहे. त्याचबरोबर प्रथम श्रेणीतील सरासरी पाहिली तर ब्रॅडमन यांच्यानंतर सरफराज याचाच क्रमांक लागतो.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा गाठल्यानंतर भारतीय खेळाडूंची सरासरी पाहिली तर सरफराज अव्वल स्थानावर आहे. त्याने विजय मर्चंट 76.61 आणि अजय शर्मा 67.46 यांना मागे टाकले आहे.
सरफराजने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना अधिक धावा केल्या होत्या. त्याने 6 सामन्यांच्या 8 डावांमध्ये 123च्या सरासरीने 982 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 4 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. यामधील त्याची 275 ही सर्वोत्कृष्ट खेळी ठरली, तर कोणताही फलंदाज 700 पर्यंत पोहोचला नाही. तसेच त्याने लिस्ट एच्या 21 सामन्यांतील 16 डावांमध्ये एक शतकासह 325 धावा केल्या आहेत.
सरफराजच्या इराणी चषकातील अफलातून खेळीने भारताचा टी20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यानेही ट्वीट करत त्याचे कौतुक केले आहे. उत्तम कामगिरी करूनही सरफराजने भारताकडून अद्याप पदार्पण केलेले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्याही झाला सरफराज खानचा फॅन! इराणी ट्रॉफीतील शतकानंतर शेअर केली खास पोस्ट
टी20 विश्वचषक 2022: दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने शमी-सिराजच्या तयारीची उडवली खिल्ली
INDvSA: किंग कोहलीच्या खास यादीत समाविष्ट होण्याची सूर्याला संधी! केवळ एवढ्याच धावांची आवश्यकता






