सर्फराज खानने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार शतक झळकावले आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर धावा काढण्यात त्याला कोणतीही अडचण आली नाही. सर्फराजमुळे टीम इंडिया सामन्याच्या दुसऱ्या डावात चांगल्या स्थितीत पोहोचली आहे. बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेत त्याला एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मानेवर ताण आल्याने शुबमन गिल खेळला नाही. परिणामी त्याच्या जागी सर्फराजला संधी मिळाली. ही संधी त्याने दोन्ही हातांनी स्वीकारली आणि सामन्यात दमदार शतक झळकावले. प्रथम त्याने विराट कोहलीसोबत 137 धावांची भागीदारी केली. यानंतर रिषभ पंतसोबत 100 धावांची भागीदारी केली. टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया मागे पडली होती. आता सर्फराजच्या शानदार खेळीमुळे ती पुन्हा ड्रायव्हिंग सीटवर आली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सर्फराज खान शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने शानदार पुनरागमन केले. त्याने दमदार फलंदाजीचे उदाहरण मांडत, आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. यासह त्याने 110 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 13 चौकार आणि तीन षटकार मारले. तो अजूनही क्रीजवर उपस्थित आहे. एकाच कसोटीत भारतीय फलंदाजाने शून्य आणि शतक झळकावण्याची ही 22वी वेळ आहे.
न्यूझीलंडविरुद्ध एकाच कसोटीत भारतीय फलंदाजाने शून्य आणि शतक झळकावण्याची गेल्या 10 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. सर्फराजच्या आधी 2014 मध्ये शिखर धवनने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत शून्य आणि 115 धावा केल्या होत्या. सर्फराजने शिखर धवनची बरोबरी केली आहे.
सरफराज खानने 2024 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघासाठी पदार्पण केले. आतापर्यंत त्याने टीम इंडियासाठी चार कसोटी सामन्यांमध्ये 325 धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. या कालावधीत त्याची सरासरी 65.00 झाली आहे.
हेही वाचा-
सरफराजनंतर श्रेयस अय्यरचा धमाका! तुफानी शतक ठोकून दिलं निवडकर्त्यांना उत्तर
एमएस धोनीचा हा विक्रम मोडीत काढत रिषभ पंत बनला नंबर-1 कीपर, न्यूझीलंडचे धाबे दणाणले
पावसाचा भारताला फायदा! 46 धावांवर ऑलआऊट होऊनही रोहित-सेना इतिहास रचण्याच्या मार्गावर…