क्रिकेट सामना सुरू असताना बरेसचे लक्षवेधी प्रसंग पाहायला मिळत असतात. एखादा फलंदाज आगळा वेगळा शॉट खेळतो. तर एखादा क्षेत्ररक्षक उत्कृष्ट झेल टिपतो. तर गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. परंतु एपिंग सीसी आणि रेनहॅम यांच्यात झालेल्या सामन्यात काहीसा आगळा वेगळा प्रकार पाहायला मिळाला, जो तुम्ही क्वचितच पाहिला असेल.
तर झाले असे की, या सामन्यात एपिंग सीसी संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला होता. परंतु सुरुवातीलाच त्यांना धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. पहिल्या डावातील ४३ वे षटक संपल्यानंतर संघाच्या धावा १५१ धावा होत्या. रेनहॅम संघातील गोलंदाज आक्रमक गोलंदाजी करत होते.
त्यामुळे एपिंग सीसी संघातील फलंदाजांवर धावा करण्याचा दबाव वाढू लागला होता. दबावाखाली येऊन नॉन स्ट्राइकवर फलंदाजी करत असलेल्या फलंदाजाने असे काही केले, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
आगळ्या वेगळ्या प्रकारे झाला धावबाद
डावातील ४४ वे षटक सुरू असताना गोलंदाजाने लेग साईडच्या दिशेने चेंडू टाकला. तो चेंडू फलंदाजाने सोडून दिला. परंतु नॉन स्ट्राइकला फलंदाजी करत असलेल्या फलंदाजाला धाव घेण्याची अती घाई झाली होती. यष्टिरक्षकाने जेव्हा चेंडू पकडला, तेव्हा त्याने फलंदाजाला बाद करण्यासाठी थ्रो केला. परंतु तो थ्रो थोडक्यात चुकला. तितक्यात नॉन स्ट्राइकला फलंदाजी करत असलेला फलंदाज सार्थक कोहली धाव घेण्यासाठी धावला आणि तो चेंडू यष्टीला जाऊन धडकला. हे पाहून फलंदाजही आश्चर्यचकित झाला होता.(Sarthak Kohli embarassing run out in the history of the cricket watch video)
https://twitter.com/ThatsSoVillage/status/1416028566949662726?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1416028566949662726%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fsarthak-kohli-embarrassing-runout-in-the-history-of-the-cricket-watch-video-80263
कोहलीचा हा दुर्दैवाने धावबाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारच्या विकेटच्या निर्णयावरुन तिसरे पंच पेचात, भारतीय दिग्गजाने ‘असे’ केले ट्रोल
तिसऱ्या वनडेत श्रीलंकेची भारतावर मात, तब्बल ‘इतक्या’ वर्षांनंतर मायदेशी झळकावली विजयी पताका
वनडे मालिकेनंतर आता टी२० सीरिजमध्ये श्रीलंकेला धूळ चारण्यास भारत सज्ज; पाहा पूर्ण वेळापत्रक