---Advertisement---

MPL 2025: सातारचे वॉरियर्स एमपीएल गाजवण्यासाठी सज्ज! पाहा संपूर्ण स्काॅड

On: बुधवार, मे 21, 2025 1:59 PM
---Advertisement---

राज्यातील क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) वतीने आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) 2025 स्पर्धा 4 जूनपासून सुरू होणार आहे. देशातील लोकप्रिय राज्यस्तरीय लीगमध्ये गणली जाणारी ही स्पर्धा यंदा तिसऱ्या हंगामात पदार्पण करत आहे. एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली ही लीगमध्ये यंदा प्रत्येक संघाला साखळी फेरीत 10 सामने खेळता येणार आहेत. (MPL 2025: Full Squad of Satara Warriors for Maharashtra Premier League)

या वर्षी स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार असून, त्यामध्ये रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स आणि कोल्हापूर टस्कर्स यांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामातील उद्घाटनाचा सामना गतविजेता रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स यांच्यात 4 जून रोजी रंगणार आहे. (MPL 2025: Maharashtra Premier League to Begin from 4th June)

स्पर्धेपूर्वी सर्व संघ जोमात तयारी करत आहेत. ज्यात सातारा वॉरियर्स संघानेही जेतेपदासाठी कंबर कसली आहे. यंदाच्या हंगामासाठी सातारा वॉरियर्सने मजबूत संघ बनवला आहे. आयपीएल स्टार असलेल्या राजवर्धन हंगरगेकरकडे संघाचे नेतृत्त्व दिले आहे. याशिवाय संघात हर्षल काटेसारखा सातत्यपुर्ण कामगिरी करणारा खेळाडू आहे. पहिली एमपीएल गाजवलेला पवन शहादेखील संघाचा भाग आहे.

एमपीएल 2025 साठी सातारा वॉरियर्सचा संघ- राजवर्धन हंगरगेकर (कर्णधार) हर्षल काटे, ओम भोसले, साैरभ नवले, मेहुल पटेल, शमसुझमा काझी, अनिकेत पोरवाल, पवन शहा, जगदिश जोपे, सन्नी पंडित, तेजस तोलसंकर, साैरभ शेवाळकर, साैरभ सिंग, विवेक शेलार, इंद्रजित शिंदे, अथर्व शेळके, शुबम मैद, वैभन दरकुंडे, अतिश कुंभार, स्वराज चव्हाण, वैभव चाैगुले, अनिरुद्ध साबळे, महेश मस्के, अर्जुन वाघ, देव नवले.

प्रेक्षकांसाठी मोफत प्रवेश आणि प्रक्षेपणाची सोय

या स्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील गहुंजे येथील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवले जातील. एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सर्व प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

तसेच, हे सामने OTT प्लॅटफॉर्म ‘JioHotstar App’ तसेच ‘Star Sports2’ वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या देखील ही स्पर्धा अनुभवता येणार आहे. (Where to Watch MPL 2025: Live on Star Sports 2 and JioCinema)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---