---Advertisement---

MPL 2025: एमपीएलच्या दुसऱ्या हंगामातील शिलेदार, ज्यांनी फलंदाजांना केलं नको-नको

On: मंगळवार, मे 20, 2025 4:33 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थात एमपीएलचा तिसरा हंगामाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातही गोलंदाजांबद्दल अनेक आखाडे बांधले जात आहेत. यंदाच्या या हंगामात रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स आणि कोल्हापूर टस्कर्स हे 6 संघ जेतेपदासाठी भिडताना दिसतील.या स्पर्धेतील शुभांरभ सामन्यातच गतविजेता संघ रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स (4 जून) रोजी आमने-सामने असतील. परंतू एमपीएलच्या दुसऱ्या हंगामात नक्की कोणते गोलंदाज यशस्वी ठरले होते?

गतहंगामात सत्यजीत बच्छावने 25 विकेट्स घेतल्या होत्या. 25 विकेट्स घेणारा तो एमपीएलच्या इतिहासातील पहिलाच गोलंदाज ठरला होता. त्याने रत्नागिरी जेट्सकडून खेळताना 12 सामन्यातील 11 डावात गोलंदाजी करताना 11.12सरासरीने या 25 विकेट्स घेतल्या होत्या.

गत उपविजेत्या ईगल नाशिक टायटन्सच्या मुकेश चौधरीनेही दमादार कामगिरी करत आपल्या संघाला फायनलमध्ये नेले होते. त्याने 12 सामन्यात 17.43च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्सचा श्रेयस चव्हाण होता. त्याने 12 सामन्यात 15.6च्या सरासरीने 20 विकेट्स घेतल्या होत्या.

रायगड रॉयल्सच्या तन्मय सांघवीने 8 सामन्यात 12.75च्या सरासरीने 16 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. तो यादीत चौथ्या क्रमांकावर राहिला होता. तर ईगल नाशिक टायटन्सचा कर्णधार प्रशांत सोलंकीने 13 सामन्यात 25.86च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या होत्या.

गहुंजे स्टेडियमवर मॅचसाठी प्रेक्षकांना एंट्री मोफत
MPLचे सर्व सामने तसेच WMPLचेही सर्व सामने यावेळी प्रेक्षकांना स्टेडियमवर जाऊन मोफत पाहता येणार आहे. याची माहिती यापुर्वी एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. चाहत्यांनी मोठ्या संख्येने स्टेडियमवर येऊन आपली टीम तसेच आवडत्या खेळाडूला पाठिंबा देण्याचे आवाहनही रोहित दादा पवार यांनी केले आहे. हे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (MCA) पुण्यातील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होतील.

आता मोबाईलवर पहा एमपीएलचे सामने
ओटीटी प्लॅटफॉर्म जीओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना MPL व WMPLचे सामने घरबसल्या पहायला मिळणार आहेत. तसेच स्टारस्पोर्ट्स चॅनेलवर टीव्हीच्या माध्यमातूनही सामने पहायला मिळणार आहेत. आपल्या गावातील, शहरातील क्रिकेटपटूला थेट टीव्हीवर पहाण्याचा आनंद प्रेक्षकांना या माध्यमातून घेता येईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---