---Advertisement---

जडेजाच्या जादूटोण्यामुळे रणजी ट्रॉफी फायनलमध्ये बंगालचा झाला पराभव? पहा व्हिडिओ

---Advertisement---

राजकोट। रणजी ट्रॉफीच्या ८६ व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे काल(१३ मार्च) पहिल्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले. मात्र बंगालला १२व्यांदा रणजी ट्रॉफीमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. या सामन्यादरम्यान एक गमतीशीर घटना घडली.

सौराष्ट्र संघाचा गोलंदाज धर्मेंद्रसिंग जडेजा या सामन्यावेळी मजा-मस्ती करताना बंगालचा फलंदाज अर्नब नंदीच्या बॅटवर जादूटोणा करताना दिसला.

झाले असे की सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ४२५ धावा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या बंगाल संघ ६ बाद २६३ धावा असा संघर्ष करत होता. पण याचवेळी नंदी आणि अनुस्तुप मुजुमदार यांनी ७ व्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी करत बंगालला सावरले.

या सामन्याच्या चौथ्या दिवशी त्यांची भागीदारी सुरु असताना सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने टाकलेल्या १४५ व्या षटकातील एक चेंडू नंदीच्या हाताला लागला. त्यामुळे बंगालचे फिजिओ मैदानावर आले. यावेळी जडेजाने नंदीची मैदानावर खाली ठेवलेली बॅट आणि ग्लव्हज् उचलले आणि मजेने त्यावर जादू करत असल्याचा अभिनय केला.

पण असे असले तरी नंदी या डावात नाबाद राहिला. मात्र या घटनेनंतर नंदी केवळ १२ धावाच जोडू शकला. कारण बंगालचा संघ ३८१ धावांवर सर्वबाद झाला. यामध्ये नंदीने १२६ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. तर मुजुमदारने ६३ धावांची खेळी केली.

या सामन्यात बंगालचा पहिला डाव ३८१ धावांवरच संपुष्टात आल्याने सौराष्ट्रने ४४ धावांची पहिल्या डावात आघाडी घेतली. हीच आघाडी सौराष्ट्रासाठी महत्त्वाची ठरली. कारण दुसऱ्या डावात सौराष्ट्र फलंदाजी करत असतानाच सामना अनिर्णित राहिला. पण सौराष्ट्रकडे आघाडी असल्याने त्यांना रणजी ट्रॉफीचे विजेतेपद देण्यात आले.

ट्रेंडिंग घडामोडी-

कोरोना इफेक्ट: कॅप्टन कोहलीचा चाहत्यांना खास संदेश

-कोरोनाने अवघड केलं! धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सलाही बसला फटका

भारत-द. आफ्रिका वनडे मालिकेपाठोपाठ ‘ही’ मोठी मालिकाही झाली रद्द

अनोखी मैत्री: खेळाडूचं उतरले मैदान कर्मचार्यांच्या मदतीला

 Blog: कोलकाता टेस्ट: अनेकांच्या लॅपटॉपमध्ये कायमची सेव्ह झालेली ती एक इनिंग

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---