इंग्लंडच्या बर्मिंघम शहरात सध्या सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये पुरुषांच्या एकेरी स्क्वॅश स्पर्धेत भारतासाठी सौरव घोषाल याने कांस्य पदक पटकावले. यजमान इंग्लंडचा खेळाडू जेम्स विल्सट्रॉप याला सौरवने ०-३ अशा अंतराने पराभूत करत कांस्य पदक जिंकले आहे. कॉमनवेल्थमध्ये स्क्वॅश एकेरीत भारताने पटकावलेले हे पहिलेच पदक आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर सौरवची चर्चा होत आहे. अशात सौरवबद्दल एक रोमांचक तथ्य पुढे आले असून त्याचे भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याच्याशी जवळचे संबंध आहेत.
सौरव (Saurav Ghoshal) आणि कार्तिक (Dinesh Karthik) हे एकमेकांचे साडू आहेत. सौरव आणि कार्तिकची पत्नी म्हणजेच दिया पल्लिकल आणि दीपिका पल्लिकल (Dipika Pallikal) या सख्ख्या बहिणी आहेत. दिया पल्लीकल ही दीपिकाची मोठी बहिण आहे. दिया आणि दीपिका पल्लिकलची आई सुसान पल्लिकल यादेखील भारतीय क्रिकेटपटू राहिल्या आहेत. सुसान यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत भारताकडून ७ कसोटी आणि २ वनडे सामने खेळले होते. तर दीपिका स्वत:ही एक स्क्वॅशपटू आहे.
वयाच्या तिशीनंतरही सौरव आणि कार्तिक गाजवतायत मैदान
इतकेच नव्हे तर, सौरव आणि कार्तिक हे दोघेही ३५ पेक्षा जास्त वर्षांचे असून आपापल्या खेळात आताही नाव गाजवत आहेत. कार्तिक गेल्या १६ वर्षांपासून भारतीय संघाकडून क्रिकेट खेळत आहे. आयपीएल २०२२ मधील जबरदस्त प्रदर्शनानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. त्याला येत्या टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघाच्या फिनिशरच्या भूमिकेत पाहिले जाऊ शकते.
दुसरीकडे ३५ वर्षीय सौरवने २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये मिश्र दुहेरीत कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकल हिच्यासोबत मिळून रौप्य पदक जिंकले होते. तसेच २०१४ इंचियोन आशियाई खेळातही सुवर्णपदक जिंकले आहे. याच हंगामात त्याने पुरुषांच्या एकेरीतही रौप्य पदक पटकावले होते.
https://www.instagram.com/p/BhlkN7FlIzN/?utm_source=ig_web_copy_link
कॉमनवेल्थमधील त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, सौरव स्क्वॅश खेळातील जगातील १५ व्या क्रमांकाचा खेळाडू आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा जेम्स विल्सट्रॉप जगातील २४ व्या क्रमांकाचा खेळाडू आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदकासाठी जेव्हा हे दोघे एकमेंसामोर आले, तेव्हा सौरवपुढे जेम्स विल्सट्रॉप खूपच दुबळा दिसला. सौरवने हा सामना ११-६, ११-१, ११-४ अशा अंतराने जिंकला. स्क्वॅश एकेरी स्पर्धेत भारताचे हे कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील पिहले पदक आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीच्या टी२० कारकिर्दीवर नेहमीसाठी ब्रेक? निवडकर्त्यांनी कारण सांगून बसवलंय बाहेर
वाढदिवस विशेष: आमीर सोहेलला “पेहली फुरसत से निकल” म्हणणारा वेंकटेश प्रसाद
विराटने का सोडलेले टीम इंडियाचे नेतृत्व? बीसीसीआयमधील जबाबदार व्यक्तीने केला गौप्यस्फोट