पुणे : कृष्णनील गोरे, शारव जाधव, ईशान लागू यांनी एसबीए कप योनेक्स-सनराईझ राज्य सबज्युनियर निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून तिस-या फेरीत प्रवेश केला.
सुधांशू बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये बुधवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिन श्रीकांत वाड यांच्या हस्ते झाले. पीडीएमबीएचे वरिष्ठ उपाध्यक्ष अण्णा नातू, सचिव आनंद जोशी, सुधांशू मेडसीकर, सुबोध मेडसीकर, गुन्हे विभाग पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यावेळी उपस्थित होते.
या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या दुस-या फेरीत कृष्णनील गोरेने ठाण्याच्या जिनय साकरियाला १५-२, १५-६ असे नमविले. कृष्णनील आणि जिनयला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. यानंतर शारव जाधवने साता-याच्या अर्जुन सामेलला १५-३, १५-५ असे सहज पराभूत केले. पुण्याच्या ईशान लागूने सोलापूरच्या राज करवीरला १५-९, १५-० असे, तर रणवीर टेमघरेने अहमदनगरच्या मयुर आढळला १५-६, १५-४ असे हरविले.
स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या सलामीच्या लढतीत पुण्याच्या अथर्व गोस्वामीने वाशिमच्या केदार राठोडवर १५-४, १५-७ अशी मात केली. यानंतर पुण्याच्या अक्षर झोपेने साता-याच्या आदित्य खामकरला १५-९, १३-१५, १५-१३ असे नमविले.
स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या सलामीच्या लढतीत पुण्याच्या जिया उत्तेकरने आपलीच शहर सहकारी पूर्वा वाडेकरला १५-१०, १५-९ असे नमविले. पुण्याच्या भक्ती पाटीलने छत्रपती संभाजीनगरच्या श्रावणी सतोणकरवर ११-१५, १५-८, १५-९ असा, तर आरोही अमरुळेने नागपूरच्या धून सांघवीवर १५-९, १३-१५, १५-१० असा विजय मिळवला.
पहिल्या फेरीचे निकाल – १७ वर्षांखालील मुले – एकेरी – बिस्वजित सिकारवार (पुणे) वि. वि. विहान गुजराथी (पुणे) १५-१३, १५-१०, वेद भोईर (ठाणे) वि. वि. अर्जुन खानविलकर (पुणे) १५-३, १५-१०, सिद्धांत कोल्हाडे (पुणे) वि. वि. जय घोडेकर १५-५, १५-१२, चैतन्य परांडेकर (पुणे) वि. वि. आदित्य पुजारी (सांगली) ११-१५, १६-१४, १५-१३, ईशान आगाशे (पुणे) वि. वि. यश गायकवाड (अहमदनगर) ९-१५, १५-९, १५-१२, पार्थ गडकरी (ठाणे) वि. वि. अनुज निरवाल (परभणी) १५-१३, १५-१, निवान जैन (ठाणे) वि. वि. आदेश डगवाले (अहमदनगर) १५-८, १५-४, केविन पटेल (पुणे) वि. वि. वेदांत पाटील (कोल्हापूर) १५-८, १२-१५, १५-५, सिद्धार्थ भोसले (पुणे) वि. वि. अनुराग साठे (पुणे) १५-८, १५-७, आरव ठाकरे (नागपूर) वि. वि. तेजस खरे (पुणे) १५-६, १५-८.
मुली – नुपूर मालवडे (लातूर) वि. वि. सुरभी गिरी (अहमदनगर) १४-१६, १५-१२, १५-६, प्रणिका ठाकरे (पुणे) वि. वि. जुई परब (मुंबई शहर) १५-४, १५-९, शिवांजली करडिले (बीड) वि. वि. तनुजा धापटे (पुणे) १५-११, १५-१४, जिज्ञासा चौधरी (पुणे) वि. वि. मृणाल पोतदार (नागपूर) १५-९, १५-११, प्रणाली डोईफोडे (पुणे) वि. वि. जश्वी भट्ट (मुंबई शहर) १५-११, १५-११. (SBA Cup Sub-Junior Badminton Tournament. Krishnanil, Sharav, Ishaan’s progress)
महत्वाच्या बातम्या –
INDvsWI । जयस्वालपासून ते बिश्नोईपर्यंत; रोहितच्या अनुपस्थितीत ‘यांना’ संधी, प्रमुख दावेदार मात्र बाहेरच
स्मिथ रचणार इतिहास! 100वी कसोटी खेळण्याआधीच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद