गोवा: स्पर्धा किंवा लीगमध्ये शेवटचा क्रमांक कुणालाही नको असतो. हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) आठव्या हंगामातील सोमवारच्या (२८ फेब्रुवारी) साखळी लढतीत शेवटचे स्थान टाळण्यासाठी एससी ईस्ट बंगाल आणि नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी यांच्यात स्पर्धा आहे.
टिळक मैदान स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांसमोर गमावण्यासारखे काहीही नाही. बाद फेरीतील आव्हान संपुष्टात आलेला नॉर्थ ईस्ट युनायटेड आणि ईस्ट बंगाल ताज्या क्रमवारीत अनुक्रमे दहाव्या आणि अकराव्या स्थानी आहे. नॉर्थ ईस्टला १९ सामन्यांत १३ गुण मिळवता आलेत. ईस्ट बंगालला १८ सामन्यांनंतर केवळ १० दहा गुणांची कमाई करता आली. ईस्ट बंगालने उर्वरित दोन लढतींमध्ये नॉर्थ ईस्टसह बंगलोर एफसीला हरवले तर त्यांच्या खात्यात १६ गुण होतील. मात्र, सोमवारच्या विजयानंतर त्यांचे दहावे स्थान कायम राहील. ईस्ट बंगालला केवळ एक विजय मिळाला आहे. दुसरीकडे, नॉर्थ ईस्ट युनायटेडने प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत अधिक (तीन)विजय मिळवलेत.
प्ले-ऑफचे आव्हान संपुष्टात आले तरी नॉर्थ ईस्टला हरवल्यास आमच्यासाठी तो महत्त्वपूर्ण विजय असेल. त्यामुळे शेवटचे स्थान टाळण्यास मदत होईल. त्यामुळे एक महत्त्वपूर्ण सामना म्हणून आम्ही सोमवारी मैदानात उतरू, असे एससी ईस्ट बंगालचे मुख्य प्रशिक्षक मारिओे रिव्हेरा यांनी नॉर्थ ईस्टविरुद्धच्या लढतीच्या पूर्वसंध्येला सांगितले. सोमवारच्या लढतीत ईस्ट बंगालला अमरजीत सिंग कियाम आणि जॅकीचंद सिंग विना खेळावे लागेल. दोघेही दुखापतग्रस्त आहेत.
नॉर्थ ईस्ट युनायटेडचा शेवटचा सामना असल्याने आठव्या हंगामाचा शेवट गोड करण्याला त्यांचे प्राधान्य असेल. आमचा संघ विजयासाठी मैदानात उतरेल आणि लीगचा शेवट विजयाने करेल, असा विश्वास प्रशिक्षक खालीद जमील यांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या आयएसएल हंगामात नॉर्थ ईस्टने बाजी मारली होती. त्याचा मानसिक फायदा त्यांना सोमवारी खेळताना मिळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
केरला ब्लास्टर्सचा चेन्नईयन एफसीवर दणदणीत विजय; उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला राखले कायम
जमशेदपूरचा विजयी चौकार; नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटती मात
आयएसएल: मुंबई सिटी एफसीच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही कायम; दुबळ्या एफसी गोवाला लोळवण्यास सज्ज