देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. ८ डिसेंबर पासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आता लवकरच उपांत्य फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत ८ संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते ८ संघ आणि कसे असेल उपांत्य फेरीतील सामन्याचे स्वरूप.(Schedule of Vijay Hazare trophy Quarter final)
रविवारी (१९ डिसेंबर) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत जयपूरच्या ३ वेग वेगळ्या ठिकाणी उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेश विरुद्ध मध्यप्रदेश (Uttar Pradesh vs Madhya Pradesh), कर्नाटक विरुद्ध राजस्थान (Karnataka vs Rajasthan) आणि विदर्भ विरुद्ध त्रिपुरा (Vidharbha vs Tripura) या ३ संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना पार पडला. यामध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि विदर्भ संघाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर ५ संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचले होते.
विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२ स्पर्धेतील उपांत्य फेरीतील (Vijay Hazare trophy Quarter final) पहिला सामना हिमाचल प्रदेश विरुद्ध उत्तर प्रदेश या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना मंगळवारी (२१ डिसेंबर) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सकाळी ९ वाजता पार पडणार आहे. त्याचदिवशी जयपूरच्या केएल सैनी मैदानावर तामिळनाडू आणि कर्नाटक संघांमध्ये दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आहे.
पुढील दोन उपांत्यपूर्व फेरीचे सामने याच मैदानांवर खेळवले जातील. तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत सौराष्ट्रचा सामना विदर्भाशी होईल, तर शेवटचा उपांत्य फेरीचा सामना केरळ विरुद्ध सर्व्हिसेस या संघांमध्ये रंगणार आहे.
विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व सामन्यांचे वेळापत्रक
२१ डिसेंबर २०२१, मंगळवार
उपांत्यपूर्व सामना १ – हिमाचल प्रदेश विरुद्ध उत्तर प्रदेश – (सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर)
उपांत्यपूर्व सामना २ – तामिळनाडू विरुद्ध कर्नाटक – (केएल सैनी मैदान, जयपूर)
२२ डिसेंबर २०२१, बुधवार
उपांत्यपूर्व सामना ३ – सौराष्ट्र विरुद्ध विदर्भ – (सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर)
उपांत्यपूर्व सामना ४ – केरळ विरुद्ध सर्व्हिसेस – (केएल सैनी ग्राउंड, जयपूर)
२४ डिसेंबर २०२१, शुक्रवार
पहिली उपांत्य सामना – (सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर)
दुसरी उपांत्य सामना – (केएल सैनी मैदान, जयपूर)
२६ डिसेंबर २०२१, रविवार
अंतिम सामना – (सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर)
महत्वाच्या बातम्या :
“रोहितची फलंदाजी पाहण्यासाठी मी पैसेही खर्च करू शकतो”, संघसहकाऱ्याकडून कर्णधाराचे कौतुक
बीसीसीआयने विराटविरोधात आखले होते षडयंत्र? महत्वाची माहिती समोर