भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या अनोख्या गोलंदाजीच्या ॲक्शनसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा त्याची गोलंदाजी पाहून जगभरातील फलंदाज आश्चर्यचकित झाले. जसप्रीत बुमराह त्याच्या शानदार कामगिरीमुळे नेहमीच चाहत्यांच्या हृदयात स्थान करतो. त्याचबरोबर चाहतेही त्यांच्या आवडत्या क्रिकेटरला फॉलो करतात. बुमराहचे देशभरात लाखो चाहते आहेत. या संदर्भातच, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलीने बुमराहच्या चांगली ॲक्शनची काॅपी केली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाळेच्या ड्रेसमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत सामना खेळत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही मुलगी हुबेहुब जसप्रीत बुमराहसारखीच गोलंदाजी करत आहे. मुलीने बुमराहच्या स्टाईलमध्ये बॉलिंग रनअप घेतला आणि नंतर त्याच पद्धतीने बॉल टाकला. हा व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर चाहते या मुलीला ‘लेडी बुमराह’ म्हणून टॅग करत आहेत.
Not only boys but Girls have also started Coping Jasprit Bumrah action
BCCI should mentor this Girl 🧒 pic.twitter.com/bbp7n8ecS5— ICT Fan (@Delphy06) August 17, 2024
अलीकडेच एका पाकिस्तानी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो मुलगा बुमराहच्या गोलंदाजीची शैलीही कॉपी करत होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रमनेही त्याचे कौतुक केले. पाकिस्तानपासून भारतापर्यंत लोक बुमराहच्या गोलंदाजीने प्रभावित झाले आहेत. जसप्रीत बुमराहचे फक्त भारतातच नाही तर पाकिस्तानातही चाहते आहेत.
खर तर, बुमराह टी-20 वर्ल्ड कपपासून ब्रेकवर आहे. बांग्लादेशविरुद्ध 19 सप्टेंबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेतही त्याचे पुनरागमन होणार नाही. त्याला विश्रांती दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. बुमराह झिम्बाब्वे मालिकेतही खेळला नव्हता, त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 आणि वनडे मालिकेत तो संघाचा भाग नव्हता. अश्या स्थितीत बुमराहचे संघात पुनरागमन कधी होणार हे पाहणे, महत्त्वाचे राहील.
हेही वाचा-
आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय, घरात घुसून इंडिजवर गाजवले वर्चस्व
‘ही अशी ट्रॉफी..’, बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकण्यासाठी पॅट कमिन्स आतुर!
ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा ही स्पर्धा गाजवणार, पाहा कधी होणार सामने