भारतीय क्रिकेट संघासाठी संजू सॅमसन याने अनेकदा महत्वाची खेळी केली आहे. मात्र, सॅमसनकडे नेहमीच संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांकडून दुर्लक्ष झाल्याचे दिसले आहे. पण वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी त्याला संघात घेतले गेले आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहेत. फोटोत चाहत्यांकडून सॅमसनला मिळणारे प्रेम किती मोठ्या प्रमाणात आहे, हे समजते.
संजू सॅमसन () मागच्या काही वर्षांमध्ये चांगले प्रदर्शन करताना दिला आहे. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या आहेत. पण तरीदेखील भारतीय संघाकडून खेळण्याची संधी त्याला खूपच कमी मिळाली. आगामी वनडे विश्वचषकात त्याला संधी मिळते की नाही, हे पाहण्यासारखे अहेल. वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेतील त्याचे प्रदर्शन पाहून संघ व्यवस्थापन याविषयी निर्णय घेऊ शकतात.
School students wearing Sanju Samson masks during World Cup trophy tour. pic.twitter.com/wJvZ9l2EMc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 13, 2023
भारतासाठी खूप कमी सामने खेळलेला सॅमसन चाहत्यांच्या बाबतीत मात्र खूप पुढे आहे. सोशल मीडियावर देखील त्याचा चाहतावर्ग चांगलाच सक्रीय असतो. एक फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. फोटोत काही शाळकरी विद्यार्थी आपल्या चेहऱ्यावर सॅमनचा मास्क लावून विश्वचषकाच्या ट्रॉफीसोबत फोटो काढला आहे. या फोटोवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स आल्याचे दिसत आहे.
दरम्यान, भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यात एकूण 10 सामने खेळला आहे. यात दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश आहे. मागच्या मोठ्या काळापासून सॅमसन भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना यावर्षी जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. (School students wearing masks of Sanju Samson pose with the World Cup trophy)
महत्वाच्या बातम्या –
फाफच्या सुपर किंग्सचा अमेरिकन लीगमध्ये धमाका, नाईट रायडर्सविरुद्ध 69 धावांनी मिळवला दणदणीत विजय
परदेशात खेळताना रोहितचा नाद करायचा नाय! 10वे कसोटी शतक ठोकत गावसकरांचा विक्रमही काढला मोडीत