भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनेकदा डावलण्यात आले आहे. पण इंडियन प्रीमियर लीगमध्ये सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरीही उंचावली आहे. आयपीएलच्या जोरावर सॅमसनने मोठा चाहतावर्ग बनवला आहे. असे असले तरी, अनेकांना चाहत्यांकडून सॅमसनला मिळणाऱ्या समर्थनाविषयी प्रश्न पडलेला असतो. आता याच प्रश्नाचे उत्तर समोर येत आहे.
संजू सॅमसन (Sanju Samson) याच्याविषयी एक मोठा खुलासा झाला आहे. सॅमसनच्या चाहत्यांनाही याविषयी कुठलीच खबर यापूर्वी नव्हती. असे सांगितले जात आहे की, सॅमसन आयपीएल खेळण्यासाठी मिळणाऱ्या मोबदल्यापैकी मोठी रक्कम देशांतर्गत क्रिकेटपटू आणि गुवणंत खेळाडूंवर खर्च करतो. माध्यमांतील वृत्तांनुसार राजस्थान रॉयल्सच्या ट्रेनरकडून माहिती मिळाली आहे की, “संजू सॅमसनला आयपीएलमध्ये जवळपास 15 कोटी रुपये मिळतात. त्यातील किमान दोन कोटी रुपये तो देशांतर्गत क्रिकेटपटू आणि प्रतिभा असणाऱ्या इतर खेळाडूंना मदत म्हणून खर्च करतो.”
राजस्थानचा हा ट्रेनर पुढे असेही म्हटला की, “संजू सॅमसन एका खेळाडूपेक्षा खूप जास्त आहे. हेच कारण आहे की, प्रत्येकाला वाटते, त्याला यश मिळाले पाहिजे. याच कारणास्तव त्याला खूप समर्थन मिळत आहे.” ट्रेनरने पुढे असेही सांगितले की, संजू राजस्थान रॉयल्सला आयपीएलमधील एक प्रमुख संघ बनवू इच्छितो. “मी संजूला 2021 नंतर आयपीएलमधील मोठ्या संघात सामील होण्याचा सल्ला दिला होता. पण तो म्हणाला, राजस्थान रॉयल्सलाच तो मोठा संघ बनवू इच्छित आहे. तो असेही म्हटला की, चला अश्विन, चहल आणि प्रसिद्ध कृष्णा या मोठ्या खेळाडूंना संघात घेऊयात. त्याच्याकडे संघासाठी खरोखर एक दृष्टी आहे,” असे या ट्रेनरने पुढे सांगितले. (Rajasthan Royals trainer revealed the secret of Sanju Samson’s fan following)
महत्वाच्या बातम्या –
शुबमनला Out देण्याच्या निर्णयावर श्रद्धा कपूरही संतापली, थेट पंचांना केलं ट्रोल, लगेच वाचा
‘अश्विनला जी वागणूक दिली, ती कुठल्याच…’, गावसकरांनी 140 कोटी भारतीयांना विचार करायला पाडले भाग