---Advertisement---

IND vs ENG: शतक झळकावलं, पण एका सवयीने यशस्वी हैराण, मैदानातच कर्णधार गिलला सांगितली अडचण

On: शनिवार, जून 21, 2025 2:34 PM
---Advertisement---

इंग्लंडच्या मैदानावर यशस्वी जयस्वालने (Yashsvi Jaiswal) पहिल्या कसोटी सामन्यात त्याच्या शानदार खेळीने सर्व चाहत्यांचे मन जिंकले. लीड्समध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकावले, त्याने 144 चेंडूत शतक पूर्ण केले. इंग्लंडच्या मैदानावर पहिल्यांदा खेळत असलेल्या यशस्वीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच धुवा उडवला. शतक झळकावल्यानंतर टीम इंडियाच्या या सलामी वीर फलंदाजाने 16 चौकार आणि 1 षटकार झळकावला. शतक झळकावल्यानंतर त्याने एक मोठी कामगिरी त्याच्या नावावर केलेली आहे.

शानदार फलंदाजी करूनही यशस्वी जयस्वाल त्याच्या एका सवयीने खूप हैराण आहे. यशस्वी मैदानामध्येच कर्णधार गिलकडे त्याची अडचण सांगताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यशस्वी जयस्वाल आणि गिल (Shubman Gill) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, व्हिडिओमध्ये यशस्वी कर्णधार गिलकडे त्याची अडचण सांगताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये यशस्वी गिलला म्हणत आहे की, तो चेंडू खेळला की त्याच्या सोबतच पुढे जातो. यशस्वी म्हणाला, हो तू फक्त बोलत रहा, मला सांगत रहा माझी सवय आहे पुढे जाण्याची.

यानंतर शुबमन गिलने यशस्वी जयस्वालला समजावले की, मी सांगितल्याशिवाय धाव घेण्यासाठी पळू नको. त्यानंतर यशस्वी म्हणाला मला जोरात धावा करण्यासाठी नको सांगू, कारण माझी सवय आहे पुढे निघून जाण्याची.

लीड्स कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी जयस्वाल आणि कर्णधार या दोघांनी मिळून शानदार फलंदाजी केली त्या दोघांनी 123 धावांची भागीदारी रचली. तिसरी विकेट पडण्याआधी दोघांनी 129 धावा केल्यामुळे, टीम इंडिया 200 धावांचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरली. यशस्वी जयस्वालने 144 चेंडूत 101 धावा केल्या. तसेच कर्णधार गिलने 175 धावांचा सामना करत 127 धावा झळकावल्या. तसेच रिषभ पंत (Rishbh Pant) देखील 65 धावा करण्यात यशस्वी ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---