नवी दिल्ली। आयपीएल ही केवळ एक स्पर्धा नसून एक मार्ग आहे लोकांच्या मनोरंजनाचा, खेळाडूंना स्वत: ला सिद्ध करण्याचा, पैसे कमाविण्याचा. याबरोबरच काही लोक असे आहेत, जे मागील १२ वर्षांपासून आयपीएलद्वारे आपले कुटुंब चालवत आहेत. सध्या आयपीएल कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. अपेक्षा व्यक्त केली जात आहे, की सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये आयपीएलचे आयोजन केले जाईल. परंतु आतापर्यंत काहीही स्पष्ट झालेले नाही. कारण या स्पर्धेचे आयोजन आयसीसी टी२० विश्वचषक २०२० आणि आशिया चषकाच्या स्थगित करण्यावर अवलंबून आहे.
जर कोणत्याही कारणामुळे आयपीएल स्पर्धेचे आयोजन झाले नाही, तर बीसीसीआय तब्बल ४००० कोटी रुपयांचे नुकसान होईलच. तसेच, काही असेही लोक आहेत, ज्यांना आपले कुटुंब चालविण्यात समस्या निर्माण होईल. या लेखात आपण त्याच लोकांबद्दल जाणून घेणार आहोत.
एका चांभाराचं कुटुंब आहे आयपीएलवर अवलंबून
आयपीएलच्या आयोजनावर चेन्नईच्या एका चांभाराचे कुटुंब अवलंबून आहे. आर भास्करन चेन्नईमध्ये चांभाराचे काम करतात, जे चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाबरोबर पहिल्या मोसमापासून जोडलेले आहेत. चेन्नईमध्ये राहणारे भास्करन १९९३ पासून एमए चिदंबरम स्टेडियममध्ये प्रत्येक सामना पाहत आहेत. ते सीएसके संघाचे अधिकृत चांभार आहेत. सामन्याच्या दिवशी ते खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या रूमजवळ काम करत असतात. भास्करनने सचिन तेंडुलकरचे पॅड्सदेखील शिवले आहेत. त्यांना ‘कॅप्टन कूल’ धोनी खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. अनेकवेळा त्यांनी सोबत चहासुद्धा पिला आहे.
भास्करन आयपीएलदरम्यान दर दिवशी १००० रुपयांची कमाई करतात. परंतु जर आयपीएलचे आयोजन झाले नाही, तर त्यांना दोन वेळच्या अन्नासाठी धडपड करावी लागू शकते. नुकतेच माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणने भास्करन यांना २५००० रुपये देऊन मदत केली होती.
चीयरलीडर्सना बसणार फटका
आयपीएलवर अवलंबून असणाऱ्यांमध्ये केवळ भारतीय लोकच नाहीत, तर परदेशी लोकही सामील आहेत. ते म्हणजे चीयरलीडर्स. चीयरलीडर्स पहिल्या मोसमापासूनच आयपीएलचा भाग आहेत आणि त्यादरम्यान ते भरगोस पैसा कमावतात. चीयरलीडर्स सोफिया रोझ आणि क्लॉय मे यांंना या मोसमात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या संघाशी जोडले आहे. तर इतर चीयरलीडर कायली एनी थॉम्पसनने तर चक्क आयपीएलसाठी आपली नोकरी सोडली आहे. ती अमेरिकेमध्ये आपल्या कुटुंबाबरोबर राहते. परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. त्यामुळे कायलीकडे इतर कोणताही मार्ग नाही.
थ्रो डाऊन तज्ज्ञांना लागणार धक्का