सध्या आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर सामने खेळले जात आहेत. क्वालिफायरमधील सुपर 6 फेरीतील 6वा सामना मंगळवारी (दि. 04 जुलै) पार पडला. या सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध स्कॉटलंड संघ आमने-सामने होते. हा सामना दोन्ही संघासाठी खूपच महत्त्वाचा होता. हा सामना स्कॉटलंड संघाने 31 धावांनी जिंकत झिम्बाब्वे संघाला पराभवाचा धक्का दिला. तसेच, झिम्बाब्वे पराभवासह विश्वचषकाच्या क्वालिफायर फेरीतून बाहेर पडला. दुसरीकडे, या विजयासह 6 गुण मिळवत स्कॉटलंड गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी विराजमान झाला.
या सामन्यात झिम्बाब्वे संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 234 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वे संघाला 41.1 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 203 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना स्कॉटलंड संघाने 31 धावांनी आपल्या नावावर केला.
Zimbabwe are knocked out ????
Scotland produce an impressive bowling display to stun Zimbabwe and keep World Cup hopes alive ????#CWC23 | #ZIMvSCO: https://t.co/zwhuDUToRP pic.twitter.com/v1qxMsRuJS
— ICC (@ICC) July 4, 2023
रायन बर्लचे प्रयत्न अपयशी
स्कॉटलंडच्या 235 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून रायन बर्ल (Ryan Burl) याने सर्वाधिक धावा कुटल्या. मात्र, त्याचे प्रयत्न तोकडे पडले. त्याने यादरम्यान 84 चेंडूत 83 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 8 चौकारांची बरसात केली. त्याच्याव्यतिरिक्त वेस्ले मधेवेरे याने 40 आणि सिकंदर रझा (Sikandar Raza) याने 34 धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा आकडा पार करू शकला नाही. स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये असलेला सीन विलियम्स या सामन्यात फक्त 12 धावा करून बाद झाला. तसेच, सलामीवीर जॉयलॉर्ड गंबी शून्य धावेवर आणि कर्णधार क्रेग इर्विन (Craig Ervine) फक्त 2 धावेवर तंबूत परतले.
यावेळी स्कॉटलंडकडून गोलंदाजी करताना ख्रिस सोल (Chris Sole) चमकला. त्याने 7 षटके गोलंदाजी करताना 33 धावा खर्चून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ब्रँडन मॅकमुलेन आणि मायकल लीस्क यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, सफयान शरीफ, मार्क वॅट आणि ख्रिस ग्रीव्हज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
स्कॉटलंडकडून लीस्कची सर्वोच्च खेळी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडकडून मायकल लीस्क याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 34 चेंडूत 48 धावांचे योगदान दिले. ही खेळी करताना त्याने 2 षटकार आणि 3 चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्याव्यतिरिक्त मॅथ्यू क्रॉस (38), ब्रँडन मॅकमुलेन (34), मुनसे (31), सलामीवीर ख्रिस्तोफर मॅकब्राईड (28) आणि मार्क वॅट (नाबाद 21) यांनी संघाच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला. त्यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही.
यावेळी झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना सीन विलियम्स याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 10 षटकात 41 धावा खर्चून 3 विकेट्स नावावर केल्या. त्याच्याव्यतिरिक्त तेंडई चतारा याने 2, तर रिचर्ड नगारवा याने 1 विकेट नावावर केली.
स्कॉटलंडचा पुढील सामना गुरुवारी (दि. 6 जुलै) नेदरलँंडविरुद्ध होणार आहे. हा सुपर 6 फेरीतील आठवा सामना असणार आहे. या सामन्यात स्कॉटलंडने विजय मिळवताच विश्वचषकासाठी प्रवेश मिळेल. तसेच, पराभव झाला, तर कदाचित नेट रनरेटच्या आधारे संघ विश्वचषकासाठी पात्र ठरू शकतो. (Scotland won by 31 runs and Zimbabwe are out of the World Cup Qualifiers)
महत्वाच्या बातम्या-
उद्ध्वस्त होत असलेल्या विंडीजला वाचवण्यासाठी धावून आला ब्रायन लारा, भारताविरुद्धच्या मालिकेत मोठी जबाबदारी
ब्रेकिंग! पुरुषांच्या इमर्जिंग Asia Cup 2023साठी भारतीय संघाची निवड, नेतृत्वाची धुरा ‘या’ पठ्ठ्याकडे