ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडनं शुक्रवारी सिडनीमध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात मोठा रेकॉर्ड बनवला आहे. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 50 बळी पूर्ण केले. यासह वयाच्या 35 वर्ष आणि 267 दिवसांमध्ये बोलँड हा कसोटीत 50 बळी घेणारा सर्वात वयस्कर वेगवान गोलंदाज बनला आहे. त्यानं न्यूझीलंडच्या बेवन काँगडॉनचा (37 वर्ष 10 दिवस) विक्रम मोडला, ज्यानं फेब्रुवारी 1975 मध्ये ही कामगिरी केली होती.
सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या पाचव्या सामन्यात स्कॉट बोलँडनं शानदार गोलंदाजी केली. पहिल्या दिवशी त्यानं 20 षटकांत 31 धावा देत 4 बळी घेतले. या काळात त्यानं आठ मेडन षटकं टाकली. बोलँडनं धोकादायक यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या विकेट घेतल्या.
दुखापतग्रस्त जोश हेझलवूडच्या जागी खेळायला आलेल्या बोलँडनं आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्यानं या मालिकेत तीन सामने खेळताना एकूण 15 विकेट घेतल्या. तर जोश हेझलवूड मालिकेतील फक्त दोनच सामने खेळू शकला आणि दुखापतीमुळे बाहेर पडला. मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा बोलँड हा पाचवा गोलंदाज आहे. विशेष म्हणजे, त्यानं या मालिकेत विराट कोहलीला तीनदा आपला बळी बनवलंय.
स्कॉट बोलँडनं 13 कसोटी सामन्यांमध्ये 18.88 च्या सरासरीनं 50 विकेट्स घेतल्या आहेत. या दरम्यान त्याची सर्वोत्तम कामगिरी 6/7 राहिली. घरच्या मैदानावर त्यानं नऊ सामन्यांमध्ये 13.34 च्या सरासरीनं 43 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांमध्ये बोलँडनं 18.55 च्या सरासरीनं 20 विकेट घेतल्या, ज्यात त्याची सर्वोत्तम कामगिरी 4/31 आहे.
हेही वाचा –
रोहित शर्माला बसणार आणखी एक धक्का! कसोटी पाठोपाठ वनडेचंही कर्णधारपद जाणार?
रोहितला ड्रॉप करण्यामागे केवळ गौतम गंभीरचा हात नाही, या व्यक्तीच्या सांगण्यावरून घेण्यात आला निर्णय
कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची अवस्था वेस्ट इंडिजपेक्षाही वाईट, दोन वर्षांत पाचव्यांदा असं घडलं