---Advertisement---

‘गिलने धवनची चिंता वाढवली! पण…’ माजी दिगग्जाने सांगितले

On: बुधवार, ऑगस्ट 24, 2022 5:27 PM
Shubman Gill & Shikhar Dhawan
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा फलंदाज शुबमन गिल याने सलामीवीराच्या रूपात काही सामन्यात उत्तम प्रदर्शन केले आहे. याच कारणास्तव अनेक जाणकारांना असे वाटत आहे की, एकदिवसीय क्रिकेटमधअये शिखर धवन ऐवजी गिलने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात केली पाहिजे. परंतु, न्यूझीलंडचा माजी दिग्गज अष्टपैलू स्कॉट स्टायरिस याचे मत काहीसे वेगळे आहे.

शुबमन गिल (Shubman Gill) भारतीय संघासाठी वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे दौऱ्यात सर्वोत्तम प्रदर्शन करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने या दोन दौऱ्यात ४५० धावा केल्या आणि यासाठी त्याला याठिकाणी मालिकावीर देखील निवडले गेले. शिखर धवन (Shikhar Dhawan) याचे प्रदर्शनही या दौऱ्यांमध्ये चांगले राहिले आणि त्यानेही संघासाठी काही सामन्यात महत्वाचे योगदान दिले. गिलच्या फलंदाजी क्रमाविषयी स्कॉट स्टायरिस (Scott Styris) याने मत मांडले आहे. स्टायरिसच्या मते तिसरा क्रमांक त्याच्यासाठी सर्वात उत्तम आहे. असे असले तरी, गिलमुळे धवनवरची चिंता मात्र वाढत आहे.

माध्यमांशी बोलताना त्याला प्रश्न विचारला गेला की, सलामीसाठी रोहित शर्माचा जोडीदार म्हणून धवन ऐवजी गिल योग्य असेल का? यावर बोलताना तो म्हणाला की, “हा एक कठीण प्रश्न आहे. कारण मला वाटते की, तुमच्याकडे चार किंवा पाच फलंदाज आहेत, जे डावाची सुरुवात करू शकतात आणि चांगले प्रदर्शनही करू शकतात. शक्यतो शुबमन गिलला थोडा वेळ द्यावा लागू शकतो किंवा तिसरा क्रमांक त्याच्यासाठी चांगली जागा असू शकते.”

स्टायरिसने पुढे बोलताना असाही उल्लेख केला की, गिलमुळे धवनची चिंता मात्र वाढत आहे. तो म्हणाला की, “तुम्हाला काय वाटते शुबमन गिलकडे किती भविष्य आहे? मला वाटते की, या भारतीय संघात त्याच्यासाठी खूप मोठे भविष्य आहे. तो शिखर धवनवर दबाव वाढवत आहे. असे असले तरी, मला अजूनही वाटते की, त्यांना डावखुऱ्या फलंदाजाचा पर्याय आवडतो. वरच्या फळीत खेळण्यासाठी डावखुरे खेळाडू कमी आहेत, जे एका सलामीवीराच्या रूपात संघात राहतील. त्यामुळेच ही धवनसाठी जमेची बाजू आहे.”

दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताने ०-४ असा विजय मिळवला होता. तर झिम्बाब्वेविरुद्धच्या दौऱ्यात भारतीय संघाने यजमानांना क्लीन स्वीप (०-३) दिला. आता संघाला आशिया चषकात चांगले प्रदर्शन करण्याचे आव्हान आहे. आशिया चषकातील पहिला सामना भारताला २८ ऑगस्ट रोजी खेळायचा आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या – 

भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात ‘या’ पाच जणांत रंगणार ‘बॅटिंग बॅटल’
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ब्रेट ली म्हणतोय, ‘मला रिषभ पंतला गोलंदाजी करायचीये!’
संघात बुमराह-शमी नसतील तेव्हा ‘त्याला’ संधी द्या! माजी दिग्गज गोलंदाजाने दिलाय मोलाचा सल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---