---Advertisement---

IPL 2021: माजी क्रिकेटरने व्यक्त केला अंदाज, सीएसकेला दिले शेवटचे स्थान; तर पहिल्या क्रमांकावर ‘हा’ संघ

On: शनिवार, एप्रिल 3, 2021 1:20 AM
dhoni csk
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्याने सुरुवात होत आहे. एक आठवडा राहिलेल्या या स्पर्धेबाबत आता सर्वत्र आतुरता पाहायला मिळत आहे. सर्व संघातील खेळाडूंनी सरावालाही सुरुवात केली आहे. असे असतानाच काही माजी खेळाडूंनी आयपीएलच्या या १४ व्या हंगामाबद्दल विविध अंदाज वर्तवण्यासही सुरुवात केली आहे.

न्यूझीलंडचे माजी दिग्गज क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिस यांनी देखील ट्विट करत या आयपीएल हंगामात कोणता संघ कितव्या क्रमांकावर राहिल याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये संघांची संभाव्य क्रमवारी सांगताना असेही म्हटले आहे की  ‘याबद्दल प्रयत्न करुन पाहू. कदाचीत आयपीएल २०२१ चे फार लवकर अंदाज व्यक्त करत आहे.’ याबरोबरच त्यांनी चाहत्यांचे काय विचार आहेत, असेही विचारले आहे.

त्यांनी ट्विटद्वारे व्यक्त केलेल्या संभाव्य क्रमवारीनुसार त्यांनी पहिल्या क्रमांकावर गतविजेत्या मुंबई इंडियन्सला अव्वल स्थानी ठेवले आहे. तसेच गतउपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला त्यांनी दुसऱ्या क्रमांकासाठी पसंती दिली आहे. तसेच पंजाब किंग्स (आधीचे नाव किंग्स इलेव्हन पंजाब) या संघाला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले असून, कंसात त्यांनी पंजाबसाठी लिलाव चांगला झाला असल्याचे कारण दिले आहे.

याबरोबरच त्यांनी चौथ्या क्रमांकासाठी सनरायझर्स हैदराबादला, तर पाचव्या क्रमांकासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पसंती दिली आहे. तसेच त्यांनी सहाव्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सला ठेवताना कंसात असेही लिहिले आहे की मॉरिसची तंदुरुस्ती आणि जोफ्रा आर्चरचे शक्य तितक्या लवकर येणे फायद्याचे असेल.

कोलकाता नाईट रायडर्सला त्यांनी फलंदाजीतील कमतरतेचे कारण सांगत सातव्या क्रमांकावर ठेवले आहे. तर ३ वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला त्यांनी शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर ठेवले आहे.

स्टायरिस यांना चाहत्यांकडून या ट्विटवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही चाहत्यांना हा अंदाज पसंतीस पडलेला नाही. तर काही चाहत्यांनी याबद्दल आपली वैयक्तिक मते व्यक्त केली आहेत.

https://twitter.com/JimmyECiego/status/1377914091335872517

https://twitter.com/RohitRa73612924/status/1377897061639581698

https://twitter.com/batmanalive/status/1378005155799461898

यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स एकूण सहावे तर सलग तिसरे विजेतेपद जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तसेच चेन्नई सुपर किंग्स चौथे आयपीएल विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करेल. तर कोलकाता नाईट रायडर्स तिसऱ्या आयपीएल विजेतेपदासाठी या हंगामात खेळेल.

सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या आयपीएल विजेतेपदाची प्रतिक्षा आहे, तर दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ पहिले आयपीएल विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतील.

महत्त्वाच्या बातम्या –

हिटमॅनचा कारनामा! आयपीएलमधील ‘हे’ दोन भन्नाट विक्रम करणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू

निवड समीतीची पसंती मिळूनही रोहितला २०११ विश्वचषकासाठी मिळाले नव्हते टीम इंडियात स्थान; ‘हे’ होते कारण

डिव्हिलियर्सने निवडली आयपीएलची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, कोहली नाही तर ‘या’ खेळाडूला केले कर्णधार 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---